spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

गडचिरोलीमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार – देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया या उपक्रमांतर्गत देशातील कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये नियो मेट्रो (Neo Metro) सुरू करण्यात येणार आहे. यात विदर्भातील आदिवासीबहूल गडचिरोली जिल्ह्याचाही समावेश करण्यात येणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मेट्रो प्रकल्पासंदर्भात माहिती दिली.

मेट्रो म्हणजे केंद्र आणि राज्यसरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बर्डी ते ऑटोमोटीव्ह चौक आणि बर्डी ते पार्डी नाका हे दोन मार्ग लवकरच सुरू होणार आहेत. आता मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय गडचिरोलीमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली.

फडणवीस म्हणाले, नागपूर मेट्रो रेल्वेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला आहे. लवकरच त्याचे लोकार्पण करण्यात येईल. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्राची मंजुरी घेण्यात येणार आहे. तत्वतः मंजुरी यास केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. दुसरा टप्पा ४३.८ किलोमीटर लांबीचा आहे. कापसी येथील ट्रांसपोर्ट नगर ते हिंगणा, उत्तरेकडे कन्हान, दक्षिणेकडे बुटीबोरी एमआयडीसी मेट्रो पोहोचेल. दुसऱ्या टप्प्याचा आराखडा आधीच तयार करण्यात आला आहे. यात थोडाफार बदल केला जाणार आहे. समृद्धी कॉरिडॉरच्या (samruddhi corridor) बाजूलाच हाय स्पिड ट्रेन धावणार आहे. येथे मालवाहतुकीसाठी लॉजिस्टिक कॉरिडॉर उभारला जाईल.

पतंजलीचा प्लांटही लवकरच सुरू करण्याच्या प्रयत्न आहे. मिहानमध्ये मोठी गुंतवणूक येत आहे. मोठमोठे उद्योजक नागपूरमध्ये येण्यास उत्सुक आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स विदर्भात उभारण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या संदर्भात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांना प्रस्ताव देण्यात आला आहे. मध्यंतरी ते चंद्रपूरला येऊन गेले. त्यावेळी त्यांनी यास तत्वतः मान्यता दिली. रिफायनरी विदर्भात आणली जावी अशी मागणी सातत्याने उद्योजकांमार्फत केली जात आहे. मात्र रिफायनरी समुद्र तटावरच अधिक व्हायबल आहे. त्यामुळे याबाबत सध्याचा काही सांगता येत नाही.

हे ही वाचा :

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकारांशी ऑफ द रेकॉर्ड दिलखुलास गप्पा, काय काय म्हणाले फडणवीस?

“घर, बंदूक, बिरयाणी” चित्रपटाच्या निमित्ताने, नागराज मंजुळे आणि आकाश थोसर सैराटनंतर पुन्हा एकत्र

आपले राहिलेले आमदार सांभाळण्यासाठीच त्यांच हे वक्तव्य; गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss