spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Netflix, Hotstar चा फ्री प्लॅन बंद; Vi चा यूजर्सला मोठा झटका

देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या व्होडाफोन आयडीयाने (Vodafone Idea) त्याच्या यूजर्सना मोठा झटका दिला आहे. कंपनीने त्यांचा सर्वात लोकप्रिय असलेला REDEX प्लॅन बंद केला आहे. कंपनीच्या REDEX प्लॅनमध्ये यूजर्सना नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टार सारख्या प्रमुख OTT प्लॅटफॉर्मची सुविधा मिळायची. आता हा प्लॅन बंद करण्यात आल्याने यूजर्समध्ये काहीशी नाराजी पसरली आहे.

व्होडाफोन आयडीयाने त्यांच्या यूजर्सला सर्वाधिक फायदेशीर असलेल्या REDEX हा पोस्टपेड प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनचा फायदा हा जुन्या यूजर्सना मोठ्या प्रमाणात होत होता. आता त्यांच्याही अॅप किंवा वेबसाईटवर हा प्लॅन दिसत नसल्याचं यूजर्सनी म्हटलं आहे.

व्होडाफोन आयडीयाच्या REDEX या पोस्टपेड प्लॅनमध्ये नेटफ्लिक्स, डिस्ने हॉटस्टारच्या फ्री सबस्क्रिप्शनसोबत अनेक फायदे मिळत होते. कंपनीचा हा प्लॅन १०९९, १६९९ आणि २२९९ या किमतीला सबस्क्राईब करता येऊ शकत होता. यामध्ये फ्री कॉलिंग आणि डेली एसएमएस तसेच अनेक चांगल्या ऑफर्स देण्यात येत होत्या. तसेच कंपनीच्या या प्लॅनमध्ये इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक एअरपोर्टवर लाऊंजचे अॅक्सेसही मिळायचं. मात्र कंपनीने हा प्लॅन का बंद केला यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

टेलिकॉम कंपनी वोडाफोन-आयडियानं त्याच्या यूजर्ससाठी प्रीपेड प्लॅनमध्ये एक खास ऑफर ठेवली आहे. कंपनीने त्याच्या १५१ रुपयांच्या प्लॅनमध्ये डिस्ने प्लस हॉटस्टार (Hotstar) या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्लॅनची वैधता ३० दिवस असणार आहे. या प्लॅनमध्ये कंपनी 8 जीबी डेटा देणार आहे. या प्लॅनमध्ये फक्त कॉलिंग आणि फ्री एसएमएस यासारख्या सुविधा मिळणार नाहीत.

हे ही वाचा :

गडचिरोलीमध्ये नियो मेट्रो सुरू करण्यात येणार – देवेंद्र फडणवीस

ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का; सामन्या आधीच गोलंदाज बाहेर

१३ जणांची कमिटी यावर निर्णय घेते; मनसे युतीबाबत चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss