spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali 2022 : देवेंद्र फडणवीस रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी; काय आहे कारण?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गेले होते. यावेळी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या परिवारास दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यादेखील उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील फडणवीस यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. रात्री उशीरा भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.

दरम्यान, काल मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली. राज्यातून आलेल्या शेतकरी कुटुंबियांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब दिवाळी साजरी केली. त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला. आलेल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबाचे यावेळी औक्षण देखील करण्यात आले. राज्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी कृती विकास आराखडा तयार करत असल्याचे सांगतानाच नैसर्गिक आपत्तीत सरकार तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्ही धीर सोडू नका. राज्य शासन तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिली. शेतकरी बांधवांनी पारंपारिक शेतीला आधुनिकतेचे बळ देऊन कमी खर्चात जास्त उत्पादन देणारी शेती करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केलं.

सध्या राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळी सण साजरा होत आहे. दीपावली निमित्त राज्यभर प्रकाशपर्व साजरे होत आहे. यानिमित्त सर्वच क्षेत्रातील लोक ऐकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. दिवाळीनिमित्तच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरी गेले होते. यावेळी दोघांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्याची काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हे ही वाचा:

Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार – देवेंद्र फडणवीस

डव आणि ट्रेसमे शॅम्पूमुळे कर्करोगाचा धोका ! युनिलिव्हरने उत्पादने परत मागवली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss