spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Panic attack : पॅनीक अटॅकची लक्षणे आणि उपाय…

पॅनिक अटॅक कोणालाही येऊ शकतो. आपल्याला अचानक भीती (fear) वाटत असेल, चिंता वाटत असेल तर हा पॅनिक अटॅकचा (Panic attack) प्रकार असू शकतो. तसेच पॅनिक अटॅक हा मानसिक आजारांशी संबंधित असतो. एखाद्या व्यक्तीला जर जास्त प्रमाणत चिंता किंवा भीती वाटू लागली तर त्या व्यक्तीला पॅनिक अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. तसेच दरवर्षी पॅनिक अटॅक डे साजरा केला जातो. पॅनिक अटॅक डे हा लोकांना त्यांच्या आयुष्यातील भीती (fear) तणाव (Stress) कमी करण्यासाठी साजरा केला जातो.

हे ही वाचा :  दिवाळीत श्वसनाचे आजार टाळण्यासाठी करा हे उपाय…

 

पॅनीक अटॅकमध्ये पॅनीकचे वेगवेगळे प्रकार असतात. या मध्ये व्यक्तीला असे वाटे की त्याचे हृदय धडधड वाजत आहे. जास्त प्रमाणात काळजी वाटणे, भीती वाटणे, वेगवेगळे विचार करणे अश्या अनेक कारणामुळे पॅनिक अटॅक (Panic attack) येतो. पॅनिक अटॅक (Panic attack) ही सामान्य बाब नाही. अचानक येणारा अटॅक म्हणजे पॅनिक अटॅक होय. हा अटॅक कधीपण , कोठीही येऊ शकतो. जर तुम्हाला असे काही वाटत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे फार गरजेचे आहे.

पॅनीक अटॅकची लक्षणे (Panic Attack Symptoms) :

हृदय जोर-जोरात धडधडत राहणे
धाप लागणे किंवा श्वास घेताना त्रास होणं
भीती वाटणं
हातपाय थरथरणे
चक्कर येणं
मळमळणे
हात आणि पाय सुन्न होणे
संपूर्ण शरीराला घाम येणे

 

पॅनीक अटॅकवर उपाय :

जर तुम्हाला काही कारणामुळे चिंता , भीती वाटत असेल तर ते कमी करा. कारण या कारणामुळे पॅनिक अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी तुम्ही सकारात्मक विचार करा. मनात कोणत्याही प्रकारची भीती , चिंता वाटू देऊ नका.

रोजचा व्यवहार नीट करा व्यवहार नीट नसेल तर त्यामुळे देखील पॅनिक अटॅक (Panic attack) येऊ शकतो. त्यामुळे कोणताही प्रकारचा व्यवहार करताना नीट एकदम करा. त्यामुळे तुमची चिंता वाढणार नाही.

ज्या गोष्टीवरून तुम्हाला भीती वाटे त्या गोष्टी करण्या टाळा. तुम्हाला जर कोणत्या जागेची भीती वाटत असेल तर त्या जागी जाणे टाळा.

हे ही वाचा :  

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसोबत साजरी केली दिवाळी

 

Latest Posts

Don't Miss