spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

खोके घेतल्याच्या आरोपांमुळे बच्चू कडू संतापले, ‘आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे’ कडूंचे आव्हान

राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारला समर्थन देणाऱ्या अमरावती जिल्ह्यतील आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. राणा यांनी केलेल्या आरोपांमुळे बच्चू कडू दुखावले असल्याचे दिसून येत आहे. समर्थनासाठी पैसे (खोके) घेतल्याचा आरोप करणाऱ्या राणा यांनी १ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करावे, अन्यथा त्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात आहेत, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.

‘विरोधक म्हणून आणि सत्तेवरुन पायउतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आम्ही समजू शकतो, त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही. मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपच्या आडोशाला राहून स्टंटबाजी करणा-या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप माझ्यावर झाले आहेत’, अशी घणाघाती टीका बच्चू कडू यांनी केली.

हेही वाचा : 

Panic attack : पॅनीक अटॅकची लक्षणे आणि उपाय…

‘सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्ही दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागवी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ, असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे.

प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांशीही आपण चर्चा करू. १ नोव्हेंबरपर्यंत राणा यांनी माफी मागितली नाही किंवा आरोपाशी संबंधित पुरावे दिले नाहीत तर वेगळा निर्णय घेऊ व बच्चू कडू स्टाईलनेच आरोपांना उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला. मी स्वबळावर चारवेळा निवडून आलो. तर राणा यांना चार पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागला. त्यामुळे आता मंत्रिपद मुद्दा नाही. आता प्रश्न राजकारणाचा नाही तर अस्तित्वाचा आहे, असे सांगत राणा यांनी आरोप करण्यामागे कुणाचेतरी मोठे पाठबळ आहे. असा आरोपही कडू यांनी केला.

Black Tea : ब्लॅक टी पिणे का आहे महत्वाचे ?

जनतेनं दिलेल्या या पुण्याईवर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रय़त्न केला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांना विनंती आहे. की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करवी. जेणेकरून हे आरोपांचे मभळ दूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे

Latest Posts

Don't Miss