spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Aditya Thackeray : शिंदे-फडणवीसांआधी ठाकरेंनी पुन्हा मारली बाजी, आदित्य ठाकरे आज पूरग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणार

यंदा परतीच्या पाऊस आणि अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. शेती नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याची माहिती समोर आली होती. शिंदे-फडणवीस यांच्या या दौऱ्याआधी आदित्य ठाकरेंनी बाजी मारली आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आज (२७ ऑक्टोबर) मैदानात उतरणार आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासोबत आदित्य ठाकरे पुणे आणि नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेट देणार आहेत. नाशिकच्या सिन्नर तसंच पुण्यातल्या जुन्नर आणि शिरुरमध्ये आदित्य ठाकरे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे दौरा संपल्यानंतर पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

Mumbai Local Train : लोकल सेवा खोळंबली, अंबरनाथ-बदलापूर दरम्यान तांत्रिक बिघाडमूळे प्रवाशांचे हाल

राजकीय वर्तुळात कालपासून केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेले अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केली आहेत. अशा बातम्या समोर येतत आहेत. दरम्यान, खरंच बाद केली का? अशी उलट चर्चादेखील सुरू आहे. अशातच यासर्वांवर आदित्य ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

संबंधित बातमी खोटी असून बातमीच्या स्त्रोतावर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली होती. यातील अडीच लाख प्रतिज्ञापत्रे बाद झाल्याच्या वृत्ताबाबत विचारलं असता आदित्य ठाकरेंनी संबंधित बातमी खोटी असल्याचं सांगितलं आहे. तसेच त्या बातमीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहनही आदित्य ठाकरेंनी केलं.

खोके घेतल्याच्या आरोपांमुळे बच्चू कडू संतापले, ‘आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे’ कडूंचे आव्हान

Latest Posts

Don't Miss