spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘ये परफेक्ट है…’: नितीश राणेंची केजरीवालांवर खणखणीत टीका

आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Aravind Kejariwal) यांनी चलनी नोटेवर (Currency Notes) महात्मा गांधी यांच्यासह लक्ष्मी देवीचा (Lakshami Devi on Currency Notes) फोटो असावा अशी मागणी केल्यानंतर आता इतर महापुरुषांचा फोटो लावण्याची मागणी होऊ लागली आहे. भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करून चलनी नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या फोटोचा वापर करण्याची मागणी केली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा अशी मागणी करणारे ट्वीट केले. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोसह प्रतिकात्म चलनी नोटेचा फोटो ट्वीट केला आहे.

केजरीवालांची सूचना – त्यांनी इंडोनेशियाचे उदाहरण म्हणूनही सांगितले, की सरकारने काही नोटांवर गणेशाचे फोटो वापरले आहेत. “मी म्हटल्याप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील…” “पण त्यासोबतच आपल्याला देवी-देवतांच्या आशीर्वादाची गरज आहे. चलनी नोटांवर एका बाजूला गणेशजी आणि लक्ष्मीजींचा आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचा फोटो असेल तर संपूर्ण देशाला आशीर्वाद मिळेल,” असं ते म्हणाले.

नितेश राणे यांनी म्हटले की, एक नागरीक म्हणून माझ्या वैयक्तिक भावना आहेत. पक्षाची ही अधिकृत भूमिका नाही. पक्षाचे नेते याबाबत भूमिका मांडतील. छत्रपती शिवाजी महाराज यांना फक्त भारतातच नाही तर जगभरात मान्यता आहे. त्यांच्याबद्दल प्रेम, आदर आहे. महाराजांचा फोटो चलनी नोटेवर असावा ही माझी भावना व्यक्त केली. चलनी नोटांवरील फोटोंबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. त्या चर्चेच्या अनुषंगाने मी माझी भावना व्यक्त केली असून त्याचा कोणाच्या वक्तव्याशी संबंध नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून याबाबतचा निर्णय झाल्यास आनंद वाटेल असेही राणे यांनी म्हटले.

काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केजरीवाल यांच्यावर गौप्यस्फोट करत या प्रस्तावाला ‘मताचे राजकारण’ म्हटले आणि ‘आप’ला भाजपची ‘बी टीम’ असे नाव दिले. “हे त्यांचे मतांचे राजकारण आहे. जर तो पाकिस्तानात गेला तर तो असेही म्हणू शकतो की मी पाकिस्तानी आहे, म्हणून मला मत द्या,” तो म्हणाला.

 

Latest Posts

Don't Miss