spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Chinmay Mandlekar : ‘द कश्मीर फाईल्स’ नंतर चिन्मय मांडलेकर ‘सनी’ चित्रपटात दिसणार अत्यंत वेगळ्या भूमिकेत

मराठी सिनेसृष्टीतील ऑल राउंडर अभिनेता म्हणजे चिन्मय मांडलेकर. या अभिनेत्याने मराठी मालिकांमधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले होते. त्याने मराठीसह हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याची शिवराज अष्टक मधील सिनेमांतील छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रचंड गाजली. त्यानंतर ‘द कश्मीर फाईल्स’ मधून त्याने बिट्टा कराटे या खलनायकाची भूमिका निभावली. या चित्रपटा दरम्यान चिन्मयचं विशेष कौतुक झालं. लवकरच त्याला ‘सुभेदार’ चित्रपटातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी त्याच्या नवीन चित्रपटाचा लूक समोर आला आहे. लवकरच चिन्मय मांडलेकर पुन्हा एकदा मोठा पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सनी’ या चित्रपटातील एक एक व्यक्तिरेखा आता गुलदस्त्याबाहेर येऊ लागल्या आहेत. विश्वजित मोहिते पाटील या कार्यसम्राट आमदाराची व्यक्तिरेखा समोर आली असून चिन्मय मांडलेकर यांनी ही भूमिका साकारली आहे. व्यक्तिरेखेची झलक पाहता विश्वजित अतिशय करारी, शिस्तप्रिय दिसत आहेत. घरात असलेला त्यांचा दबदबाही यातून अधोरेखित होत असून सनी आणि त्यांच्या नात्यात कटुता असल्याचे भासतेय. आता विश्वजित आणि सनीमध्ये नेमका कशावरून हा दुरावा आलाय, हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. चिन्मय यांचा फ्रेश आणि वेगळा लुक लक्ष वेधुन घेतोय, त्यामुळे उत्सुकता अजुन वाढली आहे. सुपरहिट चित्रपट झिम्माच्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.

हेही वाचा : 

हे असंवेदनशील सरकार आहे;सरकारने थोडासा वेळ… – सुप्रिया सुळे

मागच्या बऱ्याच दिवसांपासून बऱ्याच कलाकारांच्या सोशल मीडियावर #घरापासून_दूर चा जोरदार ट्रेंड दिसत होता. यात मराठीतील अनेक कळकरांनी त्यांची गोष्ट सांगत सहभाग नोंदवला होता. हे नेमकं काय प्रकरण आहे, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात असतानाच आता या हॅशटॅगमागे लपलेले गुपित सर्वांच्या समोर आले. सुपरहिट चित्रपट ‘झिम्मा’च्या टिमची ‘सनी’ ही पुढील भेट आहे.

क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित ‘सनी’ हा सिनेमा १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इरावती कर्णिक लिखित या चित्रपटात ‘सनी’ची भूमिका ललित प्रभाकरने साकारली आहे. अक्षय विलास बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस व उर्फी काझमी हे सिनेमाचे निर्माते असून संतोष खेर, तेजस्विनी पंडित सह-निर्माते आहेत.

झुलन गोस्वामीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल तर्फे दिग्गज क्रिकेटपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

Latest Posts

Don't Miss