spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव

आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानचा १ धावाने पराभव करून स्पर्धेतील सनसनाटी विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करत झिम्बाब्वेने १३० धावा केल्या होत्या. टी-२० क्रिकेटचा विचार करता पाकिस्तानसाठी १३१ धावांचे आव्हान किरकोळच म्हणावे लागले. पण झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना असा धडा शिकवला ज्याची इतिहासाच्या पुस्तकात नोंद झाली. या स्पर्धेतील त्यांचा सलग दुसरा पराभव आहे. गेल्या रविवारी भारताने पाकिस्तानचा मेलबर्न मैदानावर पराभव केला होता.

 झिम्बाब्वेचे विजयासाठीचे १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला ब्रॅड एव्हान्सने पहिला धक्का दिला. त्याने कर्णधार बाबर आझमला १३ धावांवर बाद केले. पाठोपाठ मुझारबानीने मोहम्मद रिझवानचा १४ धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानचे दोन्ही स्टार पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दोन्ही अव्वल फलंदाज माघारी गेल्यानंतर अनुभवी शान मसूदने इफ्तिकार अहमद सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र जाँग्वेने इफ्तिकारला ५ धावांवर बाद करत पाकिस्तानची अवस्था ७.४ षटकात ३ बाद ३६ धावा अशी केली. यानंतर आलेल्या शादाब खानने शान मसूदच्या झुंजार खेळीला समर्थ साथ देण्याचा प्रतत्न केला. या दोघांनी चौथ्याव्या षटकापर्यंत पाकिस्तानला 88 धावांपर्यंत पोहचवले. मात्र १४ चेंडूत १७ धावा करून अहमदने शानची साथ सोडली. त्याला सिकंदर रझाने माघारी धाडले. रझा फक्त इथंच थांबला नाही. त्याने त्याच १४ व्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर हैदर अलीला आल्या पावली पॅव्हेलियनमध्ये जाण्यास भाग पाडले. पाकिस्तानचा निम्मा संघ ८८ धावात तंबूत परतल्यानंतर पाकिस्तानची सर्व मदार शान मसूदवर होती.

अखेरच्या दोन षटकात २ षटकात पाकिस्तानला विजयासाठी २२ धावांची गरज होती. फलंदाजीसाठी अनुभवी मोहम्मद नवाझ होता. अखेरच्या षटकात विजयाचे समीकरण ६ चेंडूत ११ असे झाले. मात्र झिम्बाब्वेच्या ब्रॅड इव्हान्सने अशी गोलंदाजी केली ज्याने इतिहास घडला. अखेरच्या षटकात पहिल्या चेंडूवर पाकिस्तानने ३ धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली. आता ३ चेंडूत ३ धावांची गरज होती. अशात ब्रॅडने निर्धाव चेंडू टाकला. २ चेंडूत ३ धावा हव्या असताना नवाझ झेलबाद झाला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना शाहिन आफ्रिदाने चेंडू मारला आणि दोन धाव घेण्याचा प्रयत्न केला पण दुसरी धाव घेताना तो धावबाद झाला आणि झिम्बाब्वेने मॅच जिंकली.

हे ही वाचा :

हे सरकार घटना बाह्य आहे; आम्हाला फसवलं शेतकऱ्यांना नका फसवू- आदित्य ठाकरे

महाराष्ट्राला अजून एक धक्का; वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पानंतर एअरबस सी २९५ गुजरातमध्ये तयार होणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss