spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Tata Airbus Project : प्रकल्प गुजरातला जातात, मात्र मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत ; जयंत पाटील

वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार? अशी विचारणा त्यांनी सत्ताधाऱ्यांना केली आहे. पाटलांनी ट्विटच्या माध्यमातून भाष्य करताना ते म्हणाले की, एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे, हे यातून स्पष्ट होते.

हेही वाचा : 

श्री कृष्णांनी गीतेत सांगितलं आहे कि कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ….

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

याबाबत ट्वीटच्या माध्यमातून भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की, “वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते.”

“महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का? असा प्रश्न सध्या पडत आहे. गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” असं जयंत पाटील म्हणाले.

दिवाळीच्या काळात स्टंट बाजीचा वर तरुणाच्या गळ्याशी आला

दरम्यान, वेदांता- फॉक्सकॉनपाठोपाठ आता नागपुरात साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समूहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला होता. हा प्रकल्प महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात होईल अशी शक्यता होती. परंतु प्रकल्प आता गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबरमध्ये याची घोषणाही केली होती. मात्र, आता २२ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरात राज्यातील बडोदा येथे उभारला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी त्याचे भूमिपूजन करणार आहेत.

Latest Posts

Don't Miss