spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Tata Air Bus Project: ३ महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्या प्रकरणी, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता सी-२९५ या मालवाहू विमानांची बांधणी करणारा ‘टाटा एयरबस प्रकल्प’ महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. २२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचं ३० ऑक्टोंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. दरम्यान, यावरून राज्यााचे माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी सुभाष देसाई यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील ३ मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेले आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ देखील का काढत नाही असा सवालही देसाई यांनी केला. भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका देसाई यांनी केली. सोबत संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले.

हेही वाचा : 

Aditya Thackeray : ‘खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही’, पुन्हा एकदा महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे संतप्त

टाटा-एअर बसचा प्रकल्प हा २२ हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.

राज्यातील सरकार बदलल्यानंतर गेल्या तीन महिन्यात हे निर्णय झाले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकल्प नेमके गुजरात या एकाच राज्यात गेले आहेत, हा केवळ योगायोग आहे का? असा प्रश्न माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विचारला आहे.

Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून ठाकरेंची फडणवीसांना साद?, कटुता संपवण्याच्या वाटेवर

महत्त्वाचे म्हणजे हे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर या प्रकरणावर राज्य सरकार केंद्र सरकारविरोधात शब्द सुद्धा बोलत नाही. महाविकास आघाडी सरकारला दोष देण्यापलीकडे या सरकारने कोणतंही काम केलं नाही, असेही ते म्हणाले.

परतीच्या पावसानं सामान्यांना दिला महागाईचा झटका! भाज्यांच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ

Latest Posts

Don't Miss