spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईतील टॅक्सी चालक संघटना सीटबेल्ट नियमांच्या विरोधात

१ नोव्हेंबर पासून चारचाकी वाहनांमध्ये मागील आसनावर बसलेल्या प्रवाश्याना देखील सीटबेल्ट लावाणे बंधनकारक असेल असे नियम वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. त्याविरोधात काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या नियमातून टॅक्सीला (Taxi) वगळण्यात यावं, अशी मागणी वाहतूक पोलिसांना पत्राद्वारे केली आहे. टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मेस्त्री यांचा मागील महिन्यात (४ सुप्टेंबर ) रोजी कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर लगेचच भारताचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कारच्या मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल अशी घोषणा केली.

या पार्शवभूमीवर वाहतूक पोलिसांनी केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार येत्या १ नोव्हेंबरपासून चारचाकी वाहनात मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाही सीट बेल्ट लावणं बंधनकारक केलं आहे. मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसेल तर चालकावर ५०० रुपये दंड आकारण्यात येणार असून तसेच सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी १ नोव्हेंबर, २०२२ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले .

परंतु काळी-पिवळी टॅक्सीचालकांनी या नियमाला विरोध दर्शवत टॅक्सीला वगळण्याची मागणी केली आहे.कारण काळ्या- पिवळ्या टॅक्सी या मुबई महानगरातच अधिक धावतात आणि त्याच्या प्रवासाचे अंतरही कमीच असते काळी-पिवळी टॅक्सीचालकांना चार प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र पाठीमागे तीन प्रवासी बसत असल्याने तसंच कार उत्पादकांनी मागच्या दोनच सीटना सीट बेल्टची सुविधा दिल्याने तिसरा प्रवासी सीट बेल्ट लावू शकत नाही. तसेच शहरात वाहनाचा सरासरी वेग हा १२ किलोमीटरपेक्षाही कमी असतो म्हणून महानगरात टॅक्सवच्या अपघाताचे प्रमाणही कमीच आहे .त्यामुळे वाहतूक पोलिसांनी टॅक्सीची खासगी कारसोबत तुलना करु नये, या मुद्द्यांचा विचार करत मागील आसनांवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करु नये आणि हा केंद्रीय मोटर वाहन नियम काळ्या-पिवळ्या टॅक्सींसाठी लागू न करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

Latest Posts

Don't Miss