spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

तणाव : काश्मीरची दाहकता दाखवणारी आगामी वेबसीरीज लवकरच

सध्या कशमीरची परिसथिती दाखवणारे अनेक चित्रपट ,वेबसीरीज आणि मालिका आल्या आहेत. प्रेक्षकां कडून त्यांना भरपूर प्रेमही मिळत आहे ,या वर्षी प्रदर्शित झालेला ‘द काशीर फाइल्स’ या चित्रपट देखील प्रचंड गाजला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट वादग्रस्त सुद्धा ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींची कमाई केली होती.काही दिवसांपासून काशमीर फाईल्स २ ची चर्चा होत असताना आता कशमीरच्या परिस्थितीवर आधारित एक नवीन वेबसीरीज येणार आहे . तणाव असे या नवीन वेबसीरीजचे नाव आहे व नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे .

तणाव हे इस्रायलीमधील लोकप्रिय मालिका ‘फौदा’चे अधिकृत रूपांतर आहे , फौदा हा चित्रपटात इस्राएल आणि पेलीस्टाईनमधील दहशदवादी संघटना यांच्यात होणाऱ्या संघर्षावर होता .तर तणाव ही वेबसीरीज देखील भारत सरकार आणि काश्मीर मध्ये असलेल्या दहशदवादी संघटना यांच्यातील संघर्षावर आधारित असल्याचे ट्रेलर मध्ये दिसून आले आहे तसेच ट्रेलर मध्ये दिसून आले, की कशमीर मध्ये घडत असलेल्या घटना व तेथील राजकीय परिसथिती दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे . हि आगामी वेबसीरीज ‘सोनी लिव्ह’वरील प्रदर्शित होणार आहे.तणावचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा आणि सचिन ममता कृष्ण करत आहेत. हजारों ख्वाहिशें ऐसी, चमेली, खोया खोया चांद यांसारखे लोकप्रिय चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सुधीर यांनी अलीकडेच सिरीयस मेनचे दिग्दर्शन केले होते. ज्यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते .

या चित्रपटाचे निर्माते सुधीर मिश्रा यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते कि : “चित्रपट निर्माता म्हणून, तणावाने मला विविध पात्रांचा शोध घेण्याची आणि त्यांची मानसिकता खोलवर जाऊन अभ्यासण्याची संधी दिली. मानवी भावना आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकणारी ही एक घट्ट विणलेली अॅक्शन ड्रामा असलेली खरी भारतीय कथा आहे. ‘तणाव’ पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही.”

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींनी मांडली ‘एक राष्ट्र, एक गणवेश’ ची कल्पना

Aditya Thackeray : ‘खोके सरकारवर कोणाचाही विश्वास नाही’, पुन्हा एकदा महत्वपूर्ण प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं आदित्य ठाकरे संतप्त

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss