spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पाकिस्तानच भविष्य भारताच्या हाती; पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये आता भारतच पोहोचवू शकतो

पाकिस्तानचा संघ अजूनही ट्वेन्टी विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही. पण त्यांची अवस्था बिकट नक्कीच आहे. पण जर पाकिस्तानला आता ट्वेन्टी विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये पोहोचायचे असेल तर त्यासाठी भारत त्यांना मदत करू शकतो. कारण भारताच्या सामन्यांवरच आता पाकिस्तानचे सेमी फायनलचे तिकीट निश्चित होऊ शकते, असे समीकरण समोर आले आहे.

पाकिस्तान सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना त्यांचे उर्वरीत सामने अगदी मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. ज्याने त्यांचा नेट रनरेट वाढेल. तसंच भारताशिवाय ग्रुप १ मधील इतर संघानी खराब कामगिरी केल्यास पाकिस्तानला फायदा होईल. सर्वात आधी भारताला दक्षिण आफ्रिकेसह इतर सर्व सामने जिंकावे लागतील. तसंच बांग्लादेशला एक आणि झिम्बाब्वेसह दक्षिण आफ्रिकेला किमान दोन सामने गमावावे लागतील आणि असं सर्व झाल्यास पाकिस्तानचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचे चान्सेस आहेत.

भारताने आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत, त्यामुळे गुणतालिकेत चार गुणांसह ते अव्वल स्थानांवर विराजमान आहेत. आता भारत आणि पाकिस्तान यांचे तीन सामने शिल्लक आहेत. या तिन्ही सामन्यांत जर भारताने विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होऊ शकतात आणि ते सहजपणे सेमी फायनलमध्ये पोहोचू शकतात. पण दुसरीकडे पाकिस्तानलाही आपले तिन्ही सामने जिंकावे लागतील. जर पाकिस्तानने तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे सहा गुण होतील. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांनी जर सर्व सामने जिंकले दक्षिण आफ्रिकेचे पाच गुण होतील आणि ते तिसऱ्या स्थानावर राहतील. त्याचबरोबर झिम्बाब्वे, नेदरलँड्स आणि बांगलादेशचे संघही अंतिम दोन संघांत पोहोचू शकणार नाहीत. त्यामुळे जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विजय मिळवले तर त्यांना सेमी फायनलमध्ये सहजपणे पोहोचता येऊ शकते.

हे ही वाचा :

भाजप नेत्यांची महाराष्ट्राचे नुकसान होताना मोदी सरकारसमोर ब्र काढण्याची हिंमत; सचिन सावंत

रवी राणांवरील टीका महागात, बच्चू कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss