spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घणाघात, ”सरकारमध्ये ताळमेळ नाही, उद्योगमंत्र्यांकडून राज्यातील जनतेची दिशाभूल”

महाराष्ट्र राज्यातून तीन महत्त्वाचे प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्याचे कोटींचे नुकसान झाले आहे. पण याचा रोजगारावरती याचा मोठा परिणाम झाला आहे. यावरून आता विरोधकांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकार याचाच अर्थ ‘ईडी सरकार’मध्ये कुठलाच ताळमेळ नाही. हे उद्योगमंत्री राज्यातील जनतेची दिशाभूल करीत आहेत,’ असा आरोप सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केला.

हेही वाचा : 

सणासुदीत तेलकट खाल्याने पोटाला त्रास झाला आहे का? तर करा हे उपाय

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महाराष्ट्रात औद्योगिक गुंतवणुकीसाठी मोठे प्रकल्प मेरिटवर येत असताना असे काय घडले, की त्यामुळे तिन्ही प्रकल्प शेजारच्या राज्यात गेले. हे सत्य जाणून घेण्यासाठी माहिती अधिकार कायद्याची गरज नाही, तर या राज्याची नागरिक म्हणून मला यातील सत्य जाणून घ्यायचे आहे,’ असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. ‘प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नाही. राज्यात नवे मोठे उद्योगधंदे येणे व त्यातून रोजगारनिर्मिती होणे हा युवकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी जबाबदारी आणि उत्तरदायित्व निभावण्यात हे सरकार कमी पडले आहे,’ अशी टीकाही त्यांनी केली.

काल केली होती विनंती 

“संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. अनेक ठिकाणी शेतात पाणी साठलेले असून पीके जागीच कुजून गेली आहेत. शेतकऱ्यांची ही दिवाळी अक्षरशः अंधारात गेली. माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की, राज्यातील शेती व शेतकऱ्यांची स्थिती पाहता कृपया आपण ओला दुष्काळ जाहीर करावा,” अशी अत्यंत कळकळीची विनंती सुप्रिया सुळे यांनी काल केली होती.

शरीरासाठी घातक असलेले पदार्थ बऱ्याचदा खाल्ले जाऊ शकतात जाणून घ्या कोणते?

तसेच, सुप्रिया सुळे दिवाळी कार्यक्रमाच्या जाहिरातीही बोलल्या होत्या. मराठी दिवाळी साजरी, मला दिवाळी हे माहिती देताना. पण माझी विनम्र विनंती आहे की मराठी दिवाळीचा अर्थ काय? म्हणजे त्यांनी जी स्वत: ची जाहिरात केली आहे, त्यांना लाभासाठी जर पैसे दिले तर आनंदच असेल. आपण जाहिराती वापरा मराठी स्थानावर जर प्रेम असेल तर क्रिया करून दाखवा. मराठी वाचनालये करा, मराठीसाठी त्यांना मदत करा. तसं न करता स्वतः:च्या जाहिरातबाजीत मराठीपणा नको. आम्ही मराठी लोक फार स्वाभिमानी आहोत. पण आम्ही भारतीय आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि मराठी असण्याचाही सार्थ अभिमान असल्यानेच सुळे यांनी बोलावले आहे.

Latest Posts

Don't Miss