spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वसई-विरार शहरात वीज पुरवठा खंडित, अतिवृष्टीचा इशारा

दमदार बरसत असलेल्या पावसामुळे मेढे गावातील पांढऱतारा पूल पाण्याखाली गेला आहे.या पुलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे.

पालघर : दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने वसईतील तानसा नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकाठच्या गावांना धोका निर्माण झाला आहे.  दमदार बरसत असलेल्या पावसामुळे मेढे गावातील पांढऱतारा पूल पाण्याखाली गेला आहे.या पुलावरून नदीचे पाणी वाहू लागल्याने १२ गावांचा संपर्क तुटला आहे.

हेही वाचा:

घरात लावा राधा कृष्णाचा फोटो होतील फायदे

वसई-विरार शहराला सूर्या, उसगाव आणि पेल्हार धरणातून पाणीपुरवठा होत असतो. ही धरणे पालघर जिल्ह्यातील असून शासनाच्या हवामान खात्याने पालघर जिल्ह्यात दिनांक 6 मार्च ते 9 मार्चपर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने या तिन्ही  धरणाच्या ठिकाणी पावसामुळे एम.एस.ई.बी चा विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच सूर्या धरणाच्या मासवन पंपिंग स्टेशन येथे अतिवृष्टीमुळे सूर्या नदीला पूर येऊन नदीतून वाहून नेणारा कचऱ्याचा गाळ, मासवन पंपिंग स्टेशन येथील जॅक वेलमध्ये गेल्याने पंप चोकव झाला आहे. चोकब काढण्यासाठी पाणबुडी उतरवून पंप साफ करावा लागणार असल्याने त्या वेळेत पंप बंद करावा लागणार आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम शकतो. पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने शहरातील पाणीपुरवठा अनियमित व कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वसई विरार महानगरपालिकेने नागरिकांना जपून पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत.

मोदी सरकारचा नवा नारा ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ : नाना पटोले

Latest Posts

Don't Miss