spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

IND vs SA: टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार, जाणून घ्या उद्याच्या सामन्यातील भारताचे वर्चस्व

टीम इंडियाने आतापर्यंत झालेल्या दोन मॅच जिंकल्या आहे. उद्या टीम इंडियाची सि़डनी येथील पर्थ मैदानात तिसरी मॅच होणार आहे. टीम इंडियाचे चार फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.

‘कांतारा’चे निर्माते अडचणीत; ‘वराह रूपम’ गाणं चोरी केल्याचा आरोप

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत झालेल्या T२० सामन्यांवर नजर टाकली तर यामध्ये टीम इंडियाचा वरचष्मा दिसून येतो. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत २३ सामने झाले आहेत. या कालावधीत भारताने १३ सामने जिंकले. तर ९ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी एका सामन्याचा निकालही निघू शकला नाही. दक्षिण आफ्रिकेचा संघ नुकताच भारत दौऱ्यावर आला होता. यादरम्यान तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. यामध्ये भारताने २-१ ने विजय मिळवला. इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ४९ धावांनी विजय मिळवला.

दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंची यादी पाहिली तर रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. रोहितने १६ सामन्यात ४०५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके झळकावली आहेत. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने १२ सामन्यात ३०६ धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक पाचव्या स्थानावर आहे. त्याने १२ सामन्यात २१५ धावा केल्या आहेत.

गाळे दाखवा मीच कुलूप ठोकते; किशोरी पेंडणेकर

टीम इंडिया :

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल, दीपक हुडा

दक्षिण आफ्रिका टीम :

क्विंटन डी कॉक, टेम्बा बावुमा, रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नोर्टजे, लुंगी एनगिडी, हेन्रिक क्लासेन, तबरेझ शम्सी, रिझा हेंड्रिक्स, रीझा हेंड्रिक्स

Latest Posts

Don't Miss