spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुठे नेऊ ठेवला महाराष्ट्र ? टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर!

सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे.

सध्या अनेक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात आहेत. वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली आहे. आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणार असल्याची माहिती आहे. नुकतंच काही दिवसांआधी टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय. सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प (Saffron Group Project) आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे.

फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये १ हजार १८५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.

सॅफ्रन ग्रुपचे सीईओ संबंधित अधिकाऱ्यांना भेटले. परंतू जागा न मिळाल्याने हा प्रकल्प हैदराबादला जात आहे. सॅफ्रन ग्रुपचे सीईओ केंद्रीय संरक्षण मंत्र्यांना भेटले आणि जागे अभावी हा प्रकल्प हैदराबादला जात असल्याचं सांगितलं असल्याची माहिती समोर येत आहे.

विदर्भात आधीच रोजगाराची वानवा आहे. त्यातच तरूणांच्या हाताला काम देणारा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने स्थानिकांमध्ये आक्रोश पाहायला मिळत आहे. टाटा एअरबस हा प्रकल्प राज्याबाहेर गेलाय. नागपुरात होणारा हा प्रकल्प आता गुजरातला हलवण्यात आला आहे.या प्रकल्पाचं आज भूमिपूजन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमीपूजन केलं जाणार आहे.

आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडियाच्या दिशेने भारताने मोठी झेप घेतली आहे. गुजरात राज्यातील वडोदरा इथे टाटा आणि एअसबस या दोघांच्या संयुक्त उपक्रमातून C-२९५ हे मोठी वाहतूक करणारी विमानं तयार केली जाणार आहेत.

असा आहे प्रकल्प?

भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या लिप-१ए आणि लिप-१बी या प्रकारची इंजिने वापरतात. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती या एमआरओमध्ये होणार आहे. यासाठी १,१८५ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आहे. या एमआरोमुळे प्रत्यक्ष ५००-६०० उच्च कुशल रोजगार निर्माण होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या एमआरओमध्ये वर्षाकाठी २५० इंजिन्सची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची सुविधा राहील.

हे ही वाचा :

Rana VS Kadu: रवी राणा, बच्चू कडू वादात आता मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी

आमदार कैलास पाटलांचे ७व्या दिवशी उपोषण मागे

भास्कर जाधव यांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss