spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राशी भविष्य ७ जुलै २०२२

मेष : आजच्या दिवशी  वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्य विषयक समस्यांचा सामना करावा लागू शकेल. विरोधी मतप्रवाहाच्या लोकांकडून दबाव निर्माण केला जाऊ शकतो. मामाकडील नातेवाईकांच्या भेटीगाठी होऊ शकतील. साधारण दिवस राहील.
वृषभ : आज कामानिमित्त प्रवास करावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी विद्यार्जनासाठी अत्यन्त फलदायी काळ आहे. संतान प्राप्ती साठी प्रयत्न करीत असणाऱ्यांना समाधान मिळेल. छोट्या मोठ्या संस्थानिकांना दिलासादायक दिवस आहे.
मिथुन : कौटुंबिक जीवनात काहीशी धावपळ करावी लागेल. आप्तेष्टाकडून सहकार्य मिळेल. वाहन खरेदीबाबतचे निर्णय घेऊ शकाल. जुने विकार त्रासदायक ठरू शकतात. जन्मभूमी विषयक आदर वाढेल. घरात आवश्यक असलेल्या वस्तूंची खरेदी कराल.
कर्क : सामाजिक जीवनात लौकिक प्रतिष्ठा वाढेल. भाग्योदयासाठी उचित दिशेने वाटचाल सुरु होईल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक त्या अभ्यासास अनुकूल वातावरण तयार होईल. सरकार दरबारी सेवेत असलेल्या लोकांना पदोन्नती अथवा बढती मिळू शकेल.
सिंह  : जर आपणास मोठ्या व्यवहारांची बोलणी करायची असतील तर आजचा दिवस उत्तम राहील. परिवारातील लोकांच्या भेटीगाठी होतील. नकळत नयनरम्य ठिकाणची सफर घडण्याची शक्यता आहे. जुने येणे वसूल होऊ शकेल.
कन्या : आजच्या दिवशी खूप खूपकाही करण्यासाठी प्रयत्न असतील. सकारात्मक विचारांनी पुढच्या दिशेने मार्गक्रमण कराल. शेतकऱ्यांना आजचा दिवस शुभसंकेत देणारा असेल. अन्नधान्याची भरभराट होईल . चतुष्पाद प्राण्यांची काळजी घ्यावी लागेल.
तुला : आर्थिक व्यवहार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. छोटे अथवा मोठे कर्ज घेण्याचा विचार करीत असाल तर आजचा दिवस थोडा संयमाने घ्यावा लागेल. पूर्वी केलेली गुंतवणूक कामाला येईल. कमी शब्दांचा वापर करून अधिक मेहनतीची तयारी ठेवा.
वृश्चिक : वडीलधाऱ्या व्यक्तींकडून आदराची वागणूक मिळेल. दूरच्या प्रवासाचे बेत आखण्यासाठी अनुकूल दिवस आहे. उच्च शिक्षणासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. परदेश गमनाबाबत विचार सुरु असेल तर त्यात पुढंच पाऊल पडेल.
धनु : आपण करीत असलेल्या कामाला उचित यश मिळेल. दुर्जनांच्या नजरेपासून स्वतःचा बचाव करावा. कौटुंबिक सौख्याचा लाभ होईल. घर खरेदी सारखे विचार मूर्त रूप घेऊ शकतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल.
मकर : अध्यात्मिक उपासने विषयी आदरभाव निर्माण होईल. पीडित वंचित लोकांना मदत करण्याची भावना जागृत होईल. भविष्यातील घटनांचा अंदाज बांधण्यात यशस्वी व्हाल. प्रतिष्ठेच्या पदावर  नियुक्ती होऊ शकेल.
कुंभ : आजचा दिवस काहीप्रमाणात मानसिक संतुलन बिघडवणारा असेल. अविचाराने केल्या वाक्प्रयोगाचा दुषपरिणाम भोगायला लागू शकतो. शब्द हे एक शस्त्र आहे ते जपूनच वापरावे. त्यामुळे भविष्यातील जीवनात होणारी मोठी हानी टाळली जाऊ शकते.
मीन : नवा मित्र परिवार जोडला जाईल. भागीदारीत करीत असलेल्या व्यवसायात विश्वास संपादन कराल. विवाह ईच्छुकांसाठी आजचा दिवस आनंदाची बातमी देणार ठरेल. स्त्रियांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय आनंदाचे वातावरण देणारा ठरेल.

Latest Posts

Don't Miss