spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यास आपले लक्ष कोणत्याही कामात लागत नाही. चेहऱ्यावर पिंपल्स येणे हे कोणाला आवडत नाही. आपण कितीही काळजी घेतली तरीही पिंपल्स हे येतातच. यामुळे चेहऱ्याची चमक देखील कमी होते. उन्हाळ्याच्या दिवसात त्वचेला उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यामुळे पिंपल्स आणि काळे डाग आपल्या चेहऱ्यावर सतत येत असतात. तर आज आम्ही तुम्हाला या बातमीमधून काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास मदत होईल.

हे ही वाचा :

सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो ? तर हि बातमी खास तुमच्यासाठी…

 

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी ग्रीन टी चे सेवन करणे. ग्रीन टी पाण्यात घालून चहा तयार करा आणि नंतर बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवून ते गोठवण्यासाठी ठेवा आणि ते गोठल्यानंतर बर्फाचा तुकडा चेहऱ्यावर लावा. ग्रीन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स असते जे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी मदत करते.

सर्व प्रथम बारीक मेथीचे दाणे घ्या. आणि ते चांगले पाण्यात भिजवून ठेवा. चांगले भिजवून झाल्यानंतर त्याची पेस्ट बनवून घ्या आणि ती पेस्ट चेहऱ्याला १० मिनिटे लावून ठेवा. कारण मेथीमध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी मेथीचे दाणे खूप उपयुक्त आहे.

चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी बेसन मध्ये लिंबू मिक्स करून लावा. ही पेस्ट चेहऱ्यावर १० मिनिटे लावून ठेवा आणि त्यांनतर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यास मदत होते.

चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी तुम्ही मुलतानी मातीचा किंवा चंदन पावड देखील लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी मदत होते. जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर तुम्हाला मुलतानी माती आणि चंदन पावडर खूप उपयोगी पडेल.

हळदीमध्ये जास्त प्रमाणत औषधी गुणधर्म असतात. काहीवेळा पिंपल्स चेहऱ्यावरील जातात पण त्याचे डाग तसेच राहतात. तर चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स जाण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. हळदी मध्ये दुधाची मलाई मिक्स करून चेहऱ्याला १० मिनिटे लावणे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स देखील कमी होतील आणि डाग देखील जातील.

हे ही वाचा : 

चहा कॉफी ऐवजी प्या ही पेय आणि आठवड्याभरात मिळवा चमकदार त्वचा

 

 

Latest Posts

Don't Miss