spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

महिन्याभरात पावसामुळे राज्यात ६५ मृत्यूची नोंद; तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी

येत्या तीन दिवसात ही पाऊस असाच कायम राहणार असल्याने प्रशासनाने बचाव पथकांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री NDRF च्या तेरा तर SDRF च्या दोन तुकड्या दहा जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत. 

गेल्या तीन – चार दिवसात मुंबईत पाऊस सतत कोसळतोय. ९ जुलै पर्यंत असाच पाऊस कायम असण्याचा अंदाज हवामान खात्याने आधीच वर्तवला होता. मुंबईसह ठाणे, पालघर मध्ये हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला होता. (65 Deaths recorded because Monsoon) तसेच नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन ही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे मात्र हाल होऊ लागले. अनेक भागात धो धो पडणाऱ्या पावसामुळे घरांवर मोठे दगड पडण्याच्या घटना ही घडल्या आहेत. कोकण किनारपट्टी ला ही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. पुढील आणखीन तीन दिवस पाऊस असाच कायम असण्याचा अंदाज हवामान खात्याने बांधला आहे. त्यामुळे पुढच्या तीन दिवसात आता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसाचा जोर कायम बघता कोकणातील ४ हजारहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. १ जून पासून सुरू झालेल्या पावसामुळे आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू तर ५७ लोक जखमी झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसात ही पाऊस असाच कायम राहणार असल्याने प्रशासनाने बचाव पथकांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी रात्री NDRF च्या तेरा तर SDRF च्या दोन तुकड्या दहा जिल्ह्यांमध्ये तैनात केल्या आहेत.
आपत्ती काळात सर्व व्यवस्थापकीय टीम ना समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच धरणातून विसर्ग सुरू करण्यापूर्वी नागरिकांना आधीच कल्पना देण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. कोकणात सर्व जिल्ह्यात २४ तासात ६४ मिमी ते २०० मिमी पर्यंत पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यातील सर्वच नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss