Wednesday, September 25, 2024

Latest Posts

दक्षिण आफ्रिकेचा भारतावर ५ गडी राखून केली मात

भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ९ गडी गमावून १३३ धावा केल्या. टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाला २३ धावांवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा १४ चेंडूत १५ धावा करून बाद झाला. त्यानंतर विकेट्सची झुंबड उडाली. केएल राहुल ९ धावा तर विराट कोहली १२ धावा काढून बाद झाला. तिघांनाही लुंगी एनगिडीने तंबूत पाठवले. यानंतर अक्षर पटेलच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आलेला दीपक हुडाही अपयशी ठरला. त्याला खातेही उघडता आले नाही. हुडाला नॉर्टजेने यष्टिरक्षक डी कॉकच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर हार्दिक पंड्या दोन धावा करून बाद झाला. एनगिडीने हार्दिकला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

टी २० वर्ल्डकप ग्रुप २ मधील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचे विकेट्सनी पराभव करत गुणतालिकेत पाच गुणांसह अव्वल स्थान पटकावले. भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या सेमी फायनल गाठण्याच्या भाबड्या आशेवर पाणी फिरले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. खराब सुरूवातीनंतर एडिन माक्ररम (५१) आणि डेव्हिड मिलर (४६ चेंडूत नाबाद ५९ धावा) यांनी डाव सावरत झुंजार अर्धशतकी खेळी करत भारताचे आव्हान षटकात पार केले. भारताकडून अर्शदीप सिंगने २ तर हार्दिक पांड्या, मोहम्मद शमी आणि अश्विनने प्रत्येकी १ विकेट घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४० चेंडूत झुंजार ६८ धावा केल्या. या खेळीच्या जोरावरच भारत १३३ धावांपर्यंत पोहचू शकला.

सामन्यात भारताला एकामागून एक धक्के बसत गेले. रोहित शर्माच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला, त्याला १५ धावा करता आल्या. लोकेश राहुल यावेळी सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. कारण राहुलला या सामन्यात ९ धावांवर समाधान मानावे लागले. भारताचे दोन्ही सलामीवीर बाद झाले असले तरी विराट कोहली हा खेळपट्टीवर होता. कोहली या विश्वचषकात भन्नाट फॉर्मात आहे, त्यामुळे तो मोठी खेळी साकारेल, असे वाटत होते. पण कोहली यावेळी १२ धावांवर बाद झाला. कोहली बाद झाल्याचा मोठा धक्का भारतीय संघाला बसला. त्यानंतर संघात पुनरागमन करणारा दीपक हुडाला यावेळी भोपळाही फोडता आला नाही. त्याचबरोबर हार्दिक पंड्याला यावेळी दोन धावा करता आल्या. त्यानंतर सूर्याला दिनेश कार्तिकने चांगली साथ दिली, पण मोठी खेळी साकारण्यात कार्तिकही अपयशी ठरला. कार्तिकला यावेळी सहा धावा करता आल्या. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत असले तरी सूर्या मात्र धडाकेबाज फटकेबाजी करत होता.

हे ही वाचा :

गुजरातमध्ये मच्छू नदीत केबल पूल पाण्यात कोसळला; तीनशेहून अधिक नाकरीक पाण्यात

चंद्रशेखर राव यांचा नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप; दिल्लीतील काही दलाल तेलंगणच्या स्वाभिमानाला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss