spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4 : स्नेहलता वसईकरची पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री

'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. काल बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन झाले. योगेश जाधव ने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याच्या शिव्या आणि त्याची अर्वाच्य भाषा यामुळे तो त्याला घराबाहेर पडावे लागले.

‘बिग बॉस मराठी 4’ (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कार्यक्रम आहे. काल बिग बॉसच्या घरातले तिसरे एलिमिनेशन झाले. योगेश जाधव ने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला. त्याच्या शिव्या आणि त्याची अर्वाच्य भाषा यामुळे तो त्याला घराबाहेर पडावे लागले. कालच्या एलिमिनेशन नंतर खरं तर घरात 13 सदस्य उरणार होते पण बिग बॉस ने एक मोठा गेम केला आणि अचानक एक वाइल्ड कार्ड सदस्य घरात आणला. या पर्वात आता स्नेहलता वसईकरची (Snehlata Vasaikar) पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.

विकास आणि योगेश डेंजर झोनमध्ये होते. ज्यामधून योगेशला घर सोडावं लागलं. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या पर्वातली पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे. स्नेहलता वसईकरच्या येण्याने घरातील समीकरण किती बदलतील? नात्यांमध्ये काय बदल होतील? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत येईल आणि कोण सेफ होईल? कोण होईल घराचा नवा कॅप्टन? म्हणजेच येणारा आठवडा खूप आव्हानात्मक आणि उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

स्नेहलता वसईकरने अनेक मालिका आणि सिनेमांत काम केलं आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या ऐतिहासिक मालिकेत स्नेहलता सोयरा बाईसाहेबांच्या भूमिकेत दिसून आली होती. या मालिकेमुळे स्नेहलता घराघरांत पोहोचली. तिची ही भूमिका चांगलीच गाजली. स्नेहलता वसईकर तिच्या बोल्ड फोटोशूटमुळे अनेकदा चर्चेत असते. बोल्ड फोटोशूटमुळे नेटकरी तिला अनेकदा ट्रोल करत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

 कालच्या भागात तिची एंट्री होताच बिग बॉस ने एक गेम खेळला. तो गेम असा होता की स्नेहलताने प्रत्येक स्पर्धकाविषयी आपले मत व्यक्त करायचे, जो चांगला खेळतो त्याच्या नावाचे कटआऊट काठावर ठेवायचे तर जो वाईट आहे त्याचे कटआऊट पाण्यात टाकायचे. या टास्क मध्ये स्नेहलताने सगळ्यांविषयीच आपले परखड मत मांडले. पण किरण मानेवर मात्र ती चांगलीच भडकली. किरण माने ही सतत त्याच त्या चुका करतात, त्यांचा दृष्टिकोन अत्यंत घाणेरडा आणि विकास चा ते वापर करतायत यावर तिने किरणची चांगलीच खरडपट्टी काढली. एवढेच नाही तर तुला एकदा नाही तर दहा वेळा पाण्यात बुडवून वर काढायची गरज आहे, असंही ती म्हणाली. तिच्या या विधानाने मांजरेकरसुद्धा अवाक झाले. अशी दमदार एंट्री घेतल्यानंतर आता घरात ती काय हंगामा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

बिग बॉस मराठीच्या चावडीमध्ये महेश मांजरेकरांनी किरण मानेची चांगलीच कानउघडणी केली आहे. चावडीवर त्यांनी बऱ्याच सदस्यांची शाळा घेतली. कोण कुठे चुकले, कोण बरोबर खेळले सगळ्याचा हिशोब घेतला. सदस्यांच्या वर्तणुकीसाठी त्यांनी स्पर्धकांना चांगलंच सुनावले.

‘बिग बॉस मराठीच्या’ चौथ्या पर्वात १६ स्पर्धक सहभागी झाले होते. यातून निखिल राजेशिर्के आणि मेघा घाटगेला घराबाहेर जावे लागले होते. आता योगेश जाधवदेखील घराबाहेर पडला आहे. पण स्नेहलता वसईकरच्या एन्ट्रीने घरातील वातावरण आनंदमय झाले आहे. स्नेहलता वसईकर बिग बॉस मराठीचा खेळ कसा खेळणार याकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Latest Posts

Don't Miss