spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, फडणवीसांचा गौप्यस्फोट

गेल्या अनेक दिवसांपासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच राजकीय वर्तुळात चर्चेत राहिला आहे. यावर काही प्रश्न विचारलं असता देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत मांडलंय. “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. राज्याबाहेर जाणाऱ्या औद्योगिक प्रकल्पांसंदर्भात पत्रकार परिषद घेत फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी हे विधान केलंय.

देवेंद्र यांनी घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे भूमिका मांडत आपल्या बोलण्यावर कडू हे गुवाहाटीला गेल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ज्या गोष्टींवरुन वाद रंगला होता त्याच्याशी संबंधित एक मोठी घडामोड समोर आली आहे. मी फोन केला आणि आमदार बच्चु कडू हे गुवाहाटीला गेले. त्यामुळे बच्चू कडू यांनी कुणाशी सौदा केला, खोके घेतले, असं म्हणणं चुकीचं आहे. बाकी इतरांबाबत मी बोलत नाही. पण याचा अर्थ बाकीच्या लोकांनी सौदा केला, असं म्हणणं नाही. पण ते लोक माझ्या फोनवर गेलेले नाहीत. माझ्या फोनवर गेलेले एकटे बच्चू कडू आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावलेले आरोप चुकीचेच आहे, असं फडणवीस म्हणालेत. माझ्या माहिती प्रमाणे, गुवाहाटीला गेलेले सगळे आमदार एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेले होते. त्यांच्यात कुठलाही व्यवहार झाला नव्हता, असंही फडणवीस म्हणालेत. यांनी याबाबत गौप्यस्फोट करताच वेगवेगळ्या चर्चेला उधाण आल्याचे सोशल मीडियावर दिसून आले आहे.

हेही वाचा : 

Virat Kohli : विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनुष्का शर्मा भडकली, म्हणाली ‘हे गोपनीयतेचे उल्लंघन आहे’

अपक्ष आमदार बच्चु कडू यांनी तर आपल्यावर सातत्यानं खोके घेतल्याचा आरोप होत असल्याचे म्हटले होते. यावर आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनीच खुलासा करावा अशी त्यांनी मागणी होती. आमदार रवी राणा आणि कडु यांच्यातील वादाच्या पेटलेल्या ठिणगीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. यासगळ्या पार्श्वभूमीवर फडणवीस बोलले आहेत.

महाराष्ट्राला गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प देण्याएवढं मोठं मन मोदी-शाहांचं नाही – भास्कर जाधव

“मविआ सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला” – फडणवीस

पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाला, मंत्री जेलमध्ये गेले. त्यामुळे महाराष्ट्रात कुणीही यायला तयार नव्हतं. महाराष्ट्रातली विस्कटलेली घडी जागेवर आणण्याचं काम आम्ही करत आहोत. महाराष्ट्रात २५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना कॅबिनेटने मान्यता दिली आहे. एका मीटिंगमध्ये आम्ही ते मंजूर केले आहेत.

हे आमचं पाप नाही- फडणवीस

फॉक्सकॉचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही, असं तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलं होतं. परंतु प्रत्यक्षात तो गेला तेव्हा त्यांनी आमच्या सरकारच्या काळात गेल्याची भूमिका घेतली. असा पहिला फेक नरेटिव्ह त्यांनी तयार केला.

Devendra Fadnvis : महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक्स हब होणार; उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Latest Posts

Don't Miss