spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विराट कोहलीच्या हॉटेल रूमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेलची कारवाई

आपल्या खोलीत परवानगीशिवाय प्रवेश करताना एका काँट्रॅक्टरने टिपलेला व्हिडीओ क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) शेअर केल्यानंतर हॉटेल क्राऊन पर्थने जाहीर माफी मागितली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ या हॉटेलमध्ये थांबला असताना अतिउत्साही चाहत्याने कोहलीच्या रुममध्ये शिरकाव केला होता. याबद्दल विराटने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, यानंतर खडबडून जागे झालेल्या हॉटेल प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.

या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देताना हॉटेलने सांगितले आहे की त्यांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई केली असून यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला हॉटेलमध्यून काढून टाकण्यात आले आहे. क्राउन पर्थ नावाच्या हॉटेलने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आम्ही या प्रकरणात सहभागी असलेल्या आमच्या पाहुण्यांची माफी मागतो. या प्रकरणात क्राऊनने तातडीने पावले उचलली आहेत. यामध्ये ज्या व्यक्तीचा सहभाग होता त्याला काढून टाकण्यात आले असून त्याला काऊंटच्या अकाउंटमधूनही काढून टाकण्यात आले आहे. मूळ व्हिडिओ सोशल मीडियावरूनही हटवला जाईल. हॉटेलने सांगितले की ते या प्रकरणाची थर्ड पार्टीकडून चौकशी केली जात आहे . निवेदनात असे लिहिले आहे की, क्राऊन या प्रकरणाची तृतीय पक्षामार्फत चौकशी करत आहे. त्याचबरोबर असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. आम्ही भारतीय क्रिकेट संघ आणि आयसीसीची माफी मागतो.

आपल्या प्रायव्हसीवर आक्रमण करणाऱ्या चाहत्याचा विराट कोहलीने निषेध व्यक्त केला होता. संबंधिताने विराटच्या हॉटेल रुममधील व्हिडीओ शूट करुन सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘किंग कोहलीची हॉटेल रूम’ असं कॅप्शन असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कोहलीच्या वैयक्तिक वस्तू दाखवत खोलीभोवती फिरताना दिसत आहे. “चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून आनंदी होतात आणि त्यांना भेटण्यासाठी उत्साहित असतात, हे मी समजू शकतो, आणि मला नेहमीच त्याचं कौतुक राहिलं आहे. मात्र हा व्हिडीओ भयावह आहे आणि मला माझ्या प्रायव्हसीची चिंता वाटते, अशा आशयाची पोस्ट विराटने केली होती.

हे ही वाचा :

UK मध्ये कबुतरे ‘झॉम्बी’ मध्ये बदलतायत; का आणि कसे ते जाणून घ्या

Devendra Fadnavis : “माझ्या एका फोनवर बच्चू कडू गुवाहाटीला गेले”, फडणवीसांचा गौप्यस्फोट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss