spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; शिखर धवन कडे वनडेचे नेतृत्व

बांगलादेश आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शिखर धवनची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तर हार्दिक पांड्या टी- मालिकेसाठी कर्णधार असणार आहे. समितीने बांगलादेशविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले आहे. दोन्ही देशांच्या मालिकांसाठी संघात काही नव्या खेळाडूंनाही संघात संधी देण्यात आली आहे. उमरान मलिका आणि शाहबाज अहमद यांना संघात संधी देण्यात आली आहे.

सध्या टीम इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषक (T20 World Cup 2022) खेळत आहे. दरम्यान या भव्य स्पर्धेनंतर लगेचच भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये मर्यादीत षटकांचे सामने खेळणार असून यामध्ये तीन टी२० तर तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी नुकताच बीसीसीआयनं सघ जाहीक केला असून टी२० संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik pandya) तर एकदिवसीय संघाचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) असणार आहे. यावेळी दोन्ही संघामध्ये बऱ्यापैकी खेळाडू सारखे असले दिसून येत आहे. पण दोन्ही संघाचे कर्णधार वेगळे असून टी चा कर्णधार हार्दिक एकदिवसीय संघात नसून शिखर ही टी२० संघात नाही आहे. याशिवाय कुलदीप सेन हा आयपीएल २०२२ मध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू एकदिवसीय संघात निवडला गेला आहे.

न्यूझीलंडविरुद्ध टी-२० साठी भारतीय संघ : हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी भारतीय संघ : शिखर धवन, ऋषभ पंत, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्य कुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, डब्ल्यू सुंदर, शार्दुल ठाकूर, शाहबाज अहमद, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, दीपक चहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

हे ही वाचा :

Prajakta Mali : प्राजक्ता माळीच्या बोल्ड फोटोमुळे इंस्टाग्रामचं टेंपरेचर वाढले

गुजरातमधील मोरबी पूल कोसळल्याप्रकरणी चौघांना अटक, पाच जणांना घेतले ताब्यात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss