spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

…आणि अमित ठाकरे कोकणातील पर्यटनात रमले

हाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत.

सध्या राजकीय वर्तुळात शिंदे गट आणि शिवसेना असा वाद रंगला आहे. पक्षातून ४० आमदारांनी आपला वेगळा मार्ग निवडल्यानंतर उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्या पुढील भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याच्या राजकीय घडामोडींमध्ये आणखी एका ठाकरेंची चर्चा रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या विद्यार्थी संघटनेचे प्रमुख अमित ठाकरे कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल दाखल झाले.

अमित ठाकरेंनी स्वतः फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट मध्ये त्यांनी म्हटले, काल सावंतवाडी इथल्या संवाद बैठका संपल्यानंतर सहकाऱ्यांसह आंबोली घाटातल्या चौकुळ कुंभवडे गावाच्या परिसरात गेलो होतो. कोकणचा ‘रानमाणूस’ श्री. प्रसाद गावडे यांच्यासोबत भटकंती केली. इको-टुरीझमचे महत्त्व जाणून घेतले. सह्याद्रीतील अनेक नद्यांचे उगमस्थान असलेल्या या निसर्गरम्य परिसरात पायवाटेवर अनेक धबधबे पाहिले. बायो-डायव्हर्सिटीने संपन्न असा हा सावंतवाडी, दोडामार्ग इथला वाईल्ड लाईफ कॉरिडॉर आपण सर्वांनी जीवापाड जपायला हवा. कोकणासारखं निसर्ग सौंदर्य परदेशात आपल्याला क्वचितच अनुभवायला मिळतं. कोकणातल्या निसर्गाचं मोल आपण ओळखायला हवं. असं अमित ठाकरे म्हणाले.

मागील महिनाभरापासून अमित ठाकरे सतत पक्षाचे पदाधिकारी आणि युवक युवतींच्या भेटीगाठी घेत आहेत. मनसेच्या शाखांना भेट देत आणि विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करत आहेत. यावेळी अमित ठाकरेंनी भाजप नेते नितेश राणेंची ही भेट घेतली. अमित ठाकरेंनी आपल्या कोकण दौऱ्याची (Amit Thackeray’s Kokan Visit) सुरूवात सावंतवाडी येथून केली. तेथे पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्यानंतर अमित ठाकरे वेळ काढून पावसाळी पर्यावरण अनुभवण्यासाठी आंबोली घाटातील चौकुळ येथे पोहोचले. तिथे त्यांनी कोकणी युट्यूबर आणि पर्यावरण प्रेमी कोकणी रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडे (Kokani Ranmanus Prasad Gawde) यांची भेट घेतली.

जिथे नजर जाईल तिथे पसरलेलं धुकं, पावसाळी हिरवं गार वातावरण आणि बरसणाऱ्या पावसाचा आनंद घेत अमित ठाकरे कोकणातील निसर्ग अनुभवत होते. यावेळी ते ट्रेकिंग करत आसपासच्या परिसराची प्रसाद यांच्याकडून माहिती घेत होते. मी इथे कितीही वेळ थांबू शकतो आणि इथे मला पुन्हा यायला आवडेल अशा भावना अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss