spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Big Boss Marathi 4 : बिग बॉसच्या घरात पार पडले ‘विष-अमृत नॉमिनेशन कार्य’

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सीझनमधील स्पर्धकांमुळे, त्यांच्यात होणाऱ्या वादामुळे हा शो सध्या चर्चेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे करत आहेत. हा सीजन अत्यंत रंजक अशा वळणावर आला आहे. बिग बॉसने सदस्यांवर विष-अमृत हे नॉमिनेशन कार्य (Nomination Task) सोपवले आहे.

स्नेहलता अपूर्वा आणि अमृता देशमुख सोबत बोलताना दिसणार आहे. स्नेहलताचे म्हणणे आहे, “मला चुकीचे निर्णय नाही द्यायचे आहेत. ज्याने एखादा नॉमिनेशन मध्ये येईल. ते मला जे म्हणतात ना मी नाही घाबरत वैगरे … घाबरणं किंवा नाही घाबरणं हा प्रश्न नाहीये. मी माझ्या निर्णयाबद्दल साशंक झाले”. तर यावर अमृता देशमुख म्हणाली, “तुला आता जरी वाईट वाटत असेल तरी त्यांच्यासमोर बोलताना ठाम राहा.” यावर स्नेहलताचे म्हणणे आहे, निकष चुकला नव्हता ना? फक्त मी मांडताना वाक्यरचना चुकली आहे. आता आजच्या भागात नेमके काय होणार आहे हे पाहणे महत्वाचे आहे.

तर, दुसरीकडे या कार्यादरम्यान प्रत्येक जो सदस्य पेटारा उघडून त्यातील हिरव्या रंगाचे विष मिळवेल त्या सदस्याला इतर सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी मिळेल. तसेच, ज्या सदस्याच्या हाती पांढरा रंग येईल त्याला सदस्यांना नॉमिनेशन प्रक्रियेपासून सुरक्षित करता येईल. यानुसार, काल झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत प्रसाद जवादेने अमृता देशमुखला नॉमिनेट केले. तर, नुकतीच वाईल्ड कार्ड (Wild Card Entry) म्हणून एन्ट्री घेतलेल्या स्नेहलताने अपूर्वा आणि अमृता धोंगडे यापैकी अमृताला नॉमिनेट केले. बिग बॉसमध्ये झालेल्या विष-अमृत या नॉमिनेशन प्रक्रियेत अमृता देशमुख, अमृता धोंगडे, प्रसाद जवादे, विकास, त्रिशूल, किरण आणि समृध्दी घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत.

नॉमिनेशन प्रक्रियेत नॉमिनेट झालेली अमृता धोंगडे मात्र तेजस्विनीवर तसेच इतर सदस्यांवर नाराज झाली आहे. अमृताचे म्हणणे आहे, मला माहिती आहे माझी लीडरशिप क्वालिटी निगेटिव्ह आहे की पोसिटीव्ह आहे. निगेटिव्ह लोकांना तुम्ही सपोर्ट करता आहे आणि आम्हाल नाही करत याची काय गरज आहे तेजा? असं ती तेजस्विनीला म्हणते. तर, यावर तेजस्विनीचे म्हणणे आहे की, “कुठे सपोर्ट करतो आहे तिच्या निकषांवर ती पॉइंट ५ ने उजवी पडली”.

हे ही वाचा:

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत ‘या’ नव्या कलाकारांची होणार एन्ट्री

Aishwarya Rai Bachchan Birthday : ऐश्वर्या रायचे वाढदिवसा निमित्त पहा खास फोटो

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss