spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Kishori Pednekar : ‘कर नाही त्याला डर कशाला’, अडीच तासाच्या पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर व शिसवेना नेत्या किशोरी पेडणेकर यांची झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोटाळ्याप्रकरणी आरोप केले होते. या आरोपावरून पोलिसांकडून अडीच तास चौकशी करण्यात आली. दादर पोलिस ठाण्यात आज दुसऱ्यांदा त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान त्या चौकशी नंतर बाहेर आल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली तसेच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असलायची माहिती पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा : 

कॉन्सर्टमध्ये विजयच्या गाण्यावर अभिनेत्री कीर्ती सुरेशचे मनमोहक नृत्य

चौकशीनंतर दादर पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर माध्यमांशी किशोरी पेडणेकर यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, “पोलिसांचं बोलावणं आलं तेव्हाच मी सांगितलं की तीन दिवस मी बिझी आहे, पण मी येणार चौकशीला. कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. पण त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली.” “ज्या पद्धतीने हे रंगवलं जातंय त्यामधलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरु आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही.असा टोला किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांनी लगावला.

IND vs BAN: टीम इंडियाचा T20 विश्वचषकातील पुढचा सामना कधी आणि कुठे पाहायचा?

काय आहे एसआरए फ्लॅट घोटाळा ?

मुंबई पोलिसांनी एसआरए फ्लॅट घोटाळ्याचा तपास करताना सांगितले की, एकूण नऊ जणांनी एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून पैसे उकळल्याच्या तक्रारी केल्या होत्या, परंतु त्यांनी कारवाई केली नाही. फ्लॅट मिळाला ना पैसे परत दिले. याप्रकरणी पोलिसांनी महापौरांच्या निकटवर्तीयालाही अटक केली होती.

बच्चू कडूंचा राणांना इशारा; पहिली वेळ माफ आहे…

Latest Posts

Don't Miss