spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात, पायी चालण्यासाठी राज्यातील नेत्यांची ‘कसरत’ सुरू

काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहचणार आहे. यादरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही यात्रेत सहभागी होणार आहेत. शिवसेना नेते आदित्य ठाकरेही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊ शकतात, अशी माहिती समोर येत आहे. भारत जोडी यात्रा सध्या तेलंगणा राज्यातून जात आहे. यात्रेच्या महाराष्ट्रात पोहोचण्याच्या तयारीत काँग्रेस कार्यकर्ते व्यस्त आहेत.

हेही वाचा : 

Onion price : नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक घटल्याने दरात दुप्पट वाढ, जाणून घ्या नवीन दर

राज्यात भारत जोडो यात्रेच्या स्वागताच्या तयारीत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सध्या व्यस्त आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे कार्यकर्ते मराठवाडा आणि विदर्भातील यात्रेत सहभागी होणार आहेत. राज्यातील नेते यात्रेच्या तयारीत व्यस्त असताना राहुल गांधीसोबत पायी चालण्यासाठी देखील कॉंग्रेसच्या नेत्यांकडून विशेष तयारी केली जाते. राहुल गांधी हे दिवसाला पंचवीस किमी चालत असल्याने या यात्रेत चालण्यासाठी, स्टमीना टिकवण्यासाठी कॉंग्रेसचे महाराष्ट्रातील नेते व्यायाम करत आहेत. राहुल गांधी यांचा फिटनेस पाहाता राज्यातील इतर नेत्यांना त्यांच्यासोबत चालण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हे दररोज चालण्याची प्रॅक्टिस करत आहेत. तसेच सतेज पाटील, यशोमती ठाकूर, नितीन राऊत देखील विशेष मेहनत घेतान दिसत आहेत. भारत जोडो यात्रा ७ ते २० नोव्हेंबर या कालावधीत महाराष्ट्रात असेल आणि ३८२ किमीचा प्रवास असेल. नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा, जळगाव, जामोद या भागातून ती जाईल. नंतर ते मध्य प्रदेशच्या दिशेने जाईल.

Kishori Pednekar : ‘कर नाही त्याला डर कशाला’, अडीच तासाच्या पोलीस चौकशीनंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

राज्यातील यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर पटोले बोलत होते. या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल हेही सहभागी झाले होते. पटोले म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे, मात्र त्यांची उपस्थिती अद्याप निश्चित झालेली नाही. भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून राहुल गांधी नांदेड आणि बुलढाण्याच्या शेगाव येथे सभांना संबोधित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Whatsapp New Feature : व्हॉट्सॲपचं नवं फिचर अनोखे ! घ्या जाणून संपूर्ण माहिती

Latest Posts

Don't Miss