spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Amruta Fadnvis : अमृता फडणवीसांनी सुरक्षा नाकारली म्हणाल्या, “मलासुद्धा सर्वसामान्य….”

राज्य गुप्तचर विभागाच्या अहवालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना नुकतीच वाय प्लस (Y+) दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती. मात्र, आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून अमृता फडणवीस या कुठेही प्रवास करतील तेव्हा ट्रॅफिक क्लीअरन्स व्हेईकल त्यांच्यासोबत असेल. वाय प्लस सुरक्षेनुसार आता अमृता फडणवीस यांच्या दिमतीला एक एस्कॉर्ट व्हॅन आणि पाच पोलीस कर्मचारी असतील. पोलिसांची सुरक्षा ही २४ तास असेल. तर ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईकल ही पायलट व्हॅनप्रमाणे काम करेल. त्यामुळे अमृता फडणवीस प्रवास करताना संबंधित परिसरातील रस्ता मोकळा राहील, याची खबरदारी घेतली जाईल. परंतु अमृता फडणवीसांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका नाहीच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला

दरम्यान, अमृता फडणवीस यांनी ट्विट करत या सुरक्षेला विरोध दर्शवला आहे. ‘मला मुंबईच्या सामान्य नागरिकाप्रमाणे जगण्याची इच्छा आहे. माझी नम्र विनंती. मुंबई पोलिस मला ट्रॅफिक क्लीयरन्स पायलट वाहन प्रदान करू नका. असे अमृता फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अमृता फडणवीस या कुठेही प्रवास करतील तेव्हा ट्रॅफिक क्लीअरन्स व्हेईकल त्यांच्यासोबत असेल. अमृता फडणवीस यांनी वाय दर्जाच्या सुरक्षेची मागणी केली नव्हती. पण अमृता फडणवीस यांना असलेला धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला. तसेच अमृता यांच्याकडून ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलकची मागणीही करण्यात आली नव्हती.

Andheri By Poll Election 2022 – अनिल परबांनी केला मोठा आरोप; नोटांचा वापर करुन ‘नोटा’ला मतदान करण्यासाठी दबाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅफिक क्लिअरन्स व्हेईलक शक्यतो संवैधानिक पदावरील व्यक्तीला दिली जाते. सध्या ठाकरे कुटुंबातील रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या दिमतीला दोन एस्कॉर्ट व्हॅन आहेत, पण वाहतूक विभागाची सुविधा त्यांना नाही. एखाद्याच्या ताफ्यात एस्कॉर्ट व्हॅन असल्यास त्यांच्याकडून वाहतुकीच्या स्थितीचा आढावा घेतला जातो. तसेच संबंधित नेत्याच्या प्रवासादरम्यान वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील याची काळजी घेतली जाते.

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी चांगली बातमी, पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात

Latest Posts

Don't Miss