spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिग्दर्शक रवी जाधव, लेखक क्षितिज पटवर्धन लवकरच घेऊन येणार हिंदी वेबसिरिज…

या वेबसिरीज मध्ये हिंदी मधील मोठ्या अभिनेत्याची लागणार वर्णी.

मुंबई : मनोरंजन क्षेत्रातील चार दिग्गजांच्या ग्रुप फोटोमुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आघाडीचे दिग्दर्शक रवी जाधव, प्रसिद्ध नाटककार, गीतकार, थिएटर दिग्दर्शक आणि पटकथा लेखक क्षितिज पटवर्धन आणि GSEAMS चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशानदार दिसत आहेत.GSEAMS ने एक हिंदी वेब सिरीज करत असल्याचे जाहीर केले आहे. वेब सिरीजचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे.
रवी जाधव हे मराठी इंडस्ट्रीतील सर्वात प्रभावी दिग्दर्शकांपैकी एक आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नटरंग आणि बालगंधर्व या दोन उत्कृष्ट चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांचे बालक पालक, टाइमपास, न्यूड हे काही लोकप्रिय आणि सर्वत्र कौतुक झालेले चित्रपट आहेत.
क्षितिज पटवर्धन हे एक भारतीय पटकथा लेखक, नाट्यदिग्दर्शक, नाटककार आणि गीतकार आहेत. त्यांना 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार, 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठी फिल्मफेअर पुरस्कार, प्रतिष्ठित तरुण तेजंकित पुरस्कार 2019 मिळालेला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्याचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल राज्य पुरस्कार, झी गौरव, मिफ्ता आणि स्टार प्रवाह रत्न यासारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेले आहे.  चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगातील सर्वात प्रतिभावान लेखकांपैकी एक मानले जाते. टाईमपास, टाइम प्लीज, आघात, वाय झेड, क्लासमेट्स या चित्रपटांसाठी त्यांनी लेखन केलेले आहे.
“GSEAMS नेहमी दर्जेदार आशयावर भर देते आणि त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. नवीन वेब सिरीजसाठी चित्रपट क्षेत्रातील अत्यंत प्रतिभावान कलाकारांमुळे तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी आम्हाला आशा असल्याचे  GSEAMS चे अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशंकदार म्हणाले. GSEAMS हे मनोरंजन उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. मोगरा फुलाला, बोनस, फुगे, अर्जुन आणि कार्तक सारखे हिट मराठी चित्रपट दिल्यानंतर GSEAMS वेब सिरीज प्रकारात दर्जेदार आशयावर आधारित मालिका तयार करत आपल्या मूल्यांप्रती वचनबध्द असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. GSEAMS ने कोविड-19 महामारी दरम्यान वेब सिरीजच्या निर्मितीमध्ये प्रवेश केला. GSEAMS द्वारा निर्मित नक्षलबारी आणि समांतर 1 आणि 2, ओटीटीवरील दर्शकांमध्ये प्रचंड यशस्वी ठरले आहेत.

Latest Posts

Don't Miss