spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शार्क टँक इंडिया सीझन २: कारदेखोचे सीईओ अमित जैन यांचे आगमन

‘भारत पे’चे प्रबंध संचालक अश्नीर ग्रोव्हर आणि उद्योजग गझल अलघ बाहेर आहेत. आणि अमित जैन शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सत्रात असणार आहेत. मंगळवारी सोनी टेलिव्हिजनने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये या नवीन शार्कचा परिचय करण्यात आला . अमित जैन हे कार देखोचे सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. कारदेखोचे हे ऑनलाइन पोर्टल आहे ज्याच्या माध्यमातून वापरलेल्या कारची विक्री आणि खरेदी करता येते .

अश्नीर फिनटेक कंपनी ‘भारत पे’ चे संस्थापक होते. त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले आणि या वर्षाच्या सुरुवातीला कथित फसवणुकीमुळे ते बराच वादात सापडले आहेत . त्याच्या विकृत वृत्तीमुळे तो प्रेक्षकांमध्ये एक हॉट फेव्हरेट होता, परंतु दुर्दैवाने, तो आणि गझल बाकीच्या पाच शार्कप्रमाणे परत येणार नाहीत.

अमित जैन तो जयपूरचा असून त्याने आयआयटी दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. त्यांनी ऑस्टिन, टेक्सास येथील एका कंपनीत काही काळ काम केले आणि तेथेच त्यांनी पहिले स्टार्टअप सुरू केले. नंतर त्याने २००७ मध्ये आपल्या भावासोबत कार देखोची सुरुवात केली, ज्याला त्याने HT स्मार्टकास्ट शो माइंडिंग माय बिझनेस: द सीईओ स्टोरीमध्ये बोलावले, जी ‘बिलियन डॉलर कंपनी’ मध्ये बदलली आहे.

व्यवसायाचे कठीण निर्णय घेताना तो कोणाच्या विचाराने किंवा दृष्टिकोनाने काम करतो असे विचारले असता, अमित जैन यांनी सांगितले कि , मी बहुतेक वेळा वस्तुस्थितीनुसार काम करतो . जेव्हा गोष्टी चुकतात तेव्हा. माणूस म्हणून मी अधिक शांत राहून उपायांचा शोध घेतो आणि जेव्हा गोष्टींच्या व्यवसायाच्या बाजूचा विचार केला जातो तेव्हा मी अधिक दाखल घेऊन काम करतो. आमच्या ब्रँडचा इतर देशांमध्ये विस्तार करण्याबाबत अमित जैन म्हणाले, “आम्ही सध्या दक्षिण पूर्व आशियामध्ये आहोत. इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स हे तीन देश आहेत ज्यात आम्ही आधीच व्यवसाय करत आहोत. ही आमची चांगली सुरुवात झाली आहे.”

अमित जैन यांच्याशिवाय शुगर कॉस्मेटिक्सच्या विनिता सिंग, शादी डॉट कॉमचे अनुपम मित्तल, लेन्सकार्टचे पियुष बन्सल, एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या नमिता थापर आणि BOAT चे अमन गुप्ता उपस्थित राहणार आहेत

हे ही वाचा:

‘मी कोणत्याही प्रकल्पाला नकार दिलेला नाही, भागवत कराड खोटं बोलणं बंद करा’; जयंत पाटील

‘बदल्यांच्या नावाखाली मंत्री अधिकाऱ्यांकडून खंडणी वसूल करतात’,राजू शेट्टींचा राज्य सरकार गंभीर आरोप

शाहरुख खान : पाच वर्षांच्या ब्रेकनंतर किंग खानचे आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss