spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रताप सरनाईकांना मोठा झटका; ११ कोटींची संपत्ती होणार जप्त

काही दिवसांपूर्वी शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामील झालेले आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा ई.डी च्या रडारवर आले आहे. सरनाईकांची ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती, ती मालमत्ता जप्त करण्यासाठी ईडीला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटासोबत असणारे प्रताप सरनाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

ईडीने जप्त केलेली ११.४ कोटींची संपत्ती योग्य असलाचा निर्णय क्वाशी ज्युरीशरी बॉडीने दिला आहे. प्रताप सरनाईक यांची NSEL घोटाळा प्रकरणात ११.४ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली होती. मार्चमध्ये ईडीने त्यांचे ठाण्यातील दोन फ्लॅट आणि मीरा रोडमधील जमिनीचे प्लॉट जप्त केले होते. या कारवाईविरोधात सरनाईक यांनी क्वाशी ज्युरीशरी बॅाडीकडे आव्हान दिले होते. मात्र, ईडीची जप्तीची कारवाई योग्य असल्याचा निर्णय देण्यात आला आहे. त्यानंतर आता जप्त केलेली संपत्ती ईडी ताब्यात घेणार आहे. पण ईडीकडून होणाऱ्या जप्तीच्या कारवाईविरोधात प्रताप सरनाईक यांना लवादाकडे दाद मागण्याचा अधिकार असल्याचंही संबंधित प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

या वर्षी मार्च महिन्यात ईडीकडून सरनाईक यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. प्रताप सरनाईक, त्यांचे पुत्र विहंग आणि पुर्वेश आणि त्यांची कंपनी विहंग ग्रुप यांच्या मालकीची ही सर्व मालमत्ता आहे. यामध्ये ठाण्यातील दोन फ्लॅट आणि एका भूखंडाचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी २०१६ मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. या सर्व गैरव्यवहारातून गुंतवणूकदारांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा ईडीनं केला आहे.

हे ही वाचा :

सुषमा अंधारे यांचा मोठा दावा; शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात

Parambir Singh : परमबीर सिंह खंडणी प्रकरणातील निलंबित पोलीस पुन्हा सेवेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss