spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Viral Video : ‘फुकट’ च्या हेल्मेटसाठी रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी

'फुकट तिथे प्रकट' ही म्हण आपल्या देशात खूप प्रचलित आहे. जिथे मोफत गोष्टी मिळाल्या, तिथे लोकांची पाऊले नक्की वळतात.

‘फुकट तिथे प्रकट’ ही म्हण आपल्या देशात खूप प्रचलित आहे. जिथे मोफत गोष्टी मिळाल्या, तिथे लोकांची पाऊले नक्की वळतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी ज्यावर कोणत्याही प्रकारची रक्कम भरावी लागत नाही. त्याला फुकट असे म्हणतात. ही म्हण अलीकडेच मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Viral Video) जबलपूर (Jabalpur) येथे एका जनजागृती मोहिमेदरम्यान खरी असल्याचं दिसून आलं.

देशभरात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे हेल्मेट न घातल्याने होतात. तर, दुसरीकडे राज्यांचे पोलिसही हेल्मेट न घालणाऱ्या लोकांचे चलन कापताना दिसत आहेत. एवढे सगळे होऊनही अनेक लोकं हेल्मेटशिवाय दुचाकीवर जाताना दिसतात. अशा परिस्थितीत जबलपूर येथील वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी चक्क हंगामा पाहायला मिळाला.

 यावेळी वाहतूक पोलिसांसमोर जनतेकडून हेल्मेटची लूट होताना दिसली. ज्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा शेअर केला जात आहे. यामध्ये मोफत हेल्मेट घेण्यासाठी लोकांची झुंबड उडताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक पोलिसांनी जनजागृती अभियानांतर्गत २०० हेल्मेट वाटपाचे नियोजन केले होते. यावेळी लोकांची एवढी गर्दी झाली की, पोलिसांनी ती शांत करण्याऐवजी हेल्मेट वाटप करत सुटले. अशा या वेळचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर, युजर्स सतत पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे आणि हेल्मेट वाटपाच्या योजनेचे कौतुक करताना दिसतात. मात्र अशा वेळी फुकट हेल्मेट घेण्यासाठी लोकांची आटोक्यात न येणारी गर्दी पोलीसही नियंत्रित करू शकले नाही, अशी माहिती आहे. यामुळे सुरक्षा यंत्रणेचे चक्क तीन-तेरा वाजलेले पाहायला मिळाले.

हे ही वाचा :

Vadapav : खाद्द्य प्रेमींना मोठा धक्का वडापाव महागणार, कारण आलंय समोर

कोणाचीही वैयक्तिक जाहिरात नाही, ही जाहिरात सरकारची आहे; अनिल परब

Avatar 2 Trailer Out: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss