spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मतभेद सोडून एकत्रित येऊन आपण जनतेला न्याय दिला पाहिजे; नवनीत राणा

भाजपाचे आमदार रवी राणा आणि प्रहारचे आमदार बचू कडूंमध्ये सध्या चांगलीच झुंपली आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचा वाद संपवण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. पण त्यानंतर सुद्धा दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वाद पँझीला मिळाला. या वादावर अमरावतीच्या खासदार आणि रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. रवी राणा व बच्चू कडू या दोघांना विनंती आहे, की आधीच अडीच वर्ष आपल्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे दोघांनी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्रित यायला पाहिजे. आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न मार्गी लावा, जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी विनंती नवनीत राणा यांनी दोघांना केली.

दोन्ही आमदार – आमदार बच्चू कडूजी आणि आमदार रवी राणाजी यांच्यात जे गैरसमज आणि विसंवाद आहे, जे मतभेद चार पाच दिवसांपासून सगळे जण पाहत आहेत, मी अमरावती जिल्ह्याची खासदार या नात्याने दोघांना विनंती करते, की गेली अडीच वर्ष आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. आता सक्षम सरकार आपल्या पाठीशी आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहेत, एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहेत, तर मी कडू आणि राणा यांना जिल्ह्यातील लोकांच्या वतीने आग्रह करेन, की आपण सगळे एकत्र आलो पाहिजे आणि जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी काम केलं पाहिजे, असं नवनीत राणा म्हणाल्या.

रवी राणांच्या आव्हानाचा बच्चू कडू यांनीही समाचार घेतला. ‘घरात घुसून मारू, निवडणुकीत पाडू, असं आव्हान रवी राणा यांनी दिल्याचं मी मीडियावर पाहिलं. रवी राणा यांना मला मारायचं असेल तर मी ५ तारखेला घरी आहे. तेव्हा त्यांनी तलवार घेऊन माझ्या घरी यावं. मी मार खायला तयार आहे. मी राणा यांच्या तलवारीचा वार छातीवर झेलेन,’ असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.

हे ही वाचा :

Viral Video : ‘फुकट’ च्या हेल्मेटसाठी रस्त्यावर लोकांची तुफान गर्दी

Vadapav : खाद्द्य प्रेमींना मोठा धक्का वडापाव महागणार, कारण आलंय समोर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss