अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र या दोन्ही कलाकारांनी लग्नाविषयी कमालिची गुप्तता पाळली आहे. परंतु त्यांच्या विवाहस्थळाविषयी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ आणि कियारा परदेशी लग्न करणार असल्याची चर्चा होती. मात्र ते परदेशी नव्हे तर भारतातच विवाहबद्ध होणार आहेत. गेल्या महिनाभरापासून सिद्धार्थ-कियारा लग्नाच्या स्थळाच्या शोधात आहेत. अखेर त्यांना त्यांच्या पसंतीप्रमाणे जागा मिळाल्याचं कळतंय.
सिद्धार्थ-कियारा चंदीगड आधी गोव्यात त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे प्लॅनिंग करत होते. परंतु, सिद्धार्थ मल्होत्राचा मोठं पंजाबी कुटुंब पाहता ते आता चंदीगडमधील आलिशान हॉटेलमध्ये लग्न करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकी कौशल-कतरिना कैफप्रमाणे सिद्धार्थ-कियाराही त्यांच्या लग्नाची चर्चा आणि तयारी गुपितपणे करू इच्छित आहेत.
हेही वाचा :
Vadapav : खाद्द्य प्रेमींना मोठा धक्का वडापाव महागणार, कारण आलंय समोर
सिद्धार्थ आणि कियारा गेल्या महिन्यापासून लग्नाच्या ठिकाणांचा शोध घेत आहेत. यादरम्यान दोघांनी चंदीगडच्या The Oberois Sukhvilas Spa & Resorts शी संपर्क साधला. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न येथेच झालं होतं. त्यामुळे किआरा आणि सिद्धार्थ देखील याच ठिकाणी लग्न करतील की आणखी दुसरं ठिकाण शोधतील हे त्यांच्या लग्नाच्या दिवशी समोर येईल.
सिद्धार्थ-कियारा हे दोघं गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ‘शेरशाह’ या चित्रपटात पहिल्यांदा दोघांनी एकत्र मोठ्या पडद्यावर काम केलं होतं. या चित्रपटाला आणि दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज’ या चित्रपटाच्या रॅप अप पार्टीमध्ये सिद्धार्थची पहिल्यांदा कियाराशी ओळख झाली होती. या भेटीनंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. सिद्धार्थने ‘स्टुंडट ऑफ द इअर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर कियाराने ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. माध्यमांसमोर हे दोघं मोकळेपणे रिलेशनशिपबद्दल बोलत नसले तरी अनेकदा या दोघांना पार्ट्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलंय.
Avatar 2 Trailer Out: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज