spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विराट कोहलीवर लावला ‘फेक फिल्डिंग’चा आरोप; बांगलादेश अंपायरिंगचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करणार

२०२२ टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यात एक अत्यंत महत्त्वाची दुसरी डाव पाहिला; पॉवरप्लेमध्ये लिटन दासने भारतीय गोलंदाजांवर मात केली, तर पावसाच्या विश्रांतीमुळे रोहित शर्माच्या खेळाडूंनी अॅडलेडमध्ये पाच धावांनी (DLS) विजय मिळवून शानदार पुनरागमन केले. बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन याने पंचांशी सविस्तर संभाषण केल्याचे स्पष्ट केले असतानाही खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा मैदानाच्या स्थितीवर प्रश्न उपस्थित झाले होते .

सामन्यात भारतानं ५ धावांनी विजय मिळवला, यावेळी भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं. सामन्यानंतर कर्णधार रोहितनं तर भारताच्या विजयाचं मुख्य कारण भारताची फिल्डिंग असल्याचं सांगितलं. पण याच फिल्डिंगदरम्यान विराट कोहलीनं फेक फिल्डिंग केल्याचा आरोप बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज नुरुल हसन (Nurul Hasan) याने’ लावला आहे. ‘कोहलीने एका थ्रोदरम्यान फेक फिल्डिंग केली होती आणि तेव्हा अम्पायरने नो बॉल दिला असता तर सामना आम्ही जिंकलो असतो’ असं हसन म्हणाला. बांगलादेशची बॅटिंग सुरु असताना ७ व्या ओव्हरमध्ये पाऊस पडायच्या आधी लिटन दास आणि शांतो फलंदाजी करत होते. तेव्हा सीमारेषेजवळ उभा असणाऱ्या अर्शदीपने एक थ्रो थेट किपरकडे केला. त्यावेळी मध्ये उभा असणाऱ्या विराटने बॉल त्याच्याकडे आहे असे दाखवत थ्रो करण्याची अॅक्शन केली. पण मूळात बॉल थेट किपरजवळ पोहोचला होता. याच थ्रोमुळे कोहलीने फेक फिल्डिंग केल्याचा आरोप नुरुलने लावला आहे.

तर सामन्याचा विचार करता सर्वात आधी पावसानंतर पुन्हा सामना सुरु झाल्यावर मैदानत पूर्णपणे कोरडं नसतानाही सामना खेळवल्यामुळे कुठेतरी बांगलादेशचा कर्णधार शाकिब नाराज होता. त्याने ही नाराजी बोलून दाखवली नसली तरी सामना पुन्हा सुरु होण्यापूर्वी तो अम्पायरसोबत बातचीत करताना दिसून आला होता. तसंच कोहली बॅटिंग करत असतानाही एका ओव्हरमध्ये आलेल्या बाऊन्सवर कोहलीने नो बॉलची मागणी केली. जी अम्पायरने ऐकली देखील, ज्यानंतरही शाकिब आणि कोहलीमध्ये बातचीत झाली दोघेही अगदी खेळीमेळीच्या वातावरणात बोलत असले तरी शाकिब या निर्णयामुळे संपूर्ण सहमत नसल्याचं दिसून आलं.

हे ही वाचा :

Imran Khan Firing : इम्रान खान यांच्या हल्लेखोराची कबुली म्हणाला, ‘मैं मारना चाहता था…’ व्हिडीओ झाला व्हायरल

T20 World Cup 2022 : सेमी फायनलसाठी पाकिस्तानचा मार्ग मोकळा आता भारताचं काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss