spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

अमृतसरमध्ये शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये सुधीर सुरी गंभीर जखमी झाले आहेत. जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे शुक्रवारी ते गोपाळ मंदिर परिसरात कचऱ्यात देवाची मुर्ती आढळल्यामुळे निदर्शने करत होते. त्यावेळी गर्दीमधील एका व्यक्तीनं सुधीर सुरी यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गोळी झाडणाऱ्याला अटक केली असून आरोपीनं कबुली दिली आहे.

सुधीर सुरी अमृतसरमधील एका मंदिराबाहेर निदर्शने करत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. या मंदिरातील काही देवीदेवतांच्या मूर्तींची विटंबना झाल्याच्या वृत्तामुळे ते या मंदिराबाहेर निदर्शने करत होते, असं सांगितलं जातंय. त्याचवेळी गर्दीमधील एका अज्ञात व्यक्तीनं त्यांच्यावर गोळीबार केला. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याची योजना करण्यात येत होती. दिवाळीमध्येच त्यांच्यावर हल्ला करण्यात येणार होता. गेल्या माहिन्यात पोलिसांनी काही गँगस्टरला अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी खुलासा केला होता. पंजाबमध्ये एसटीएफ आणि अमृतसर पोलिसांनी एकत्र कारवाई करत महिन्याभरात चार गँगस्टरला अटक केली होती. या आरोपींची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक माहितीचा खुलासा झाला होता.

पंजाबमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्यावर अमृतसरमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सुधीर सुरी हे अमृतसरमध्ये एका मंदिराच्या बाहेर निदर्शने करत होते. त्यावेळी जमलेल्या गर्दीतून पुढे आलेल्या एकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुधीर सुरी यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर गोपाळ मंदिरासमोर असलेल्या घरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याचं सांगितलं जातंय. पंजाबमधील आणखी एक शिवसेना नेते अश्वनी चोप्रा यांच्यावरही गुरुवारी प्राणघातक हल्ला झाला होता. अश्वनी चोप्रा यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर सायकलवरुन आल्याचं सांगण्यात आलं होतं.

हे ही वाचा :

कच्चा बदाम फेम अंजली अरोराला वाढदिवसाच्या दिवशी मिळाली ‘हि’ खास भेट

Phone Bhoot Review : कतरिना कैफचा ‘फोन भूत’ चित्रपट पाहायचा विचार करताय?, त्याआधी रिव्ह्यू नक्की वाचा

Emergency चित्रपटाच्या शूटिंगसाठी योग्य स्थानाचा शोध घेताना कंगना नदीत घसरली …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss