spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी (४नोव्हेंबर) बैठक झाली.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे (Gujarat Assembly Election 2022) बिगुल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस निवडणूक समितीची शुक्रवारी (४नोव्हेंबर) बैठक झाली. यामध्ये काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या नावांवर विचारमंथन केले. यानंतर काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी ४३ उमेदवारांच्या नावांची पहिली यादी जाहीर केली आहे. गुजरात निवडणुकीसंदर्भात काँग्रेसची काल झालेली दुसरी बैठक होती. ज्यामध्ये ७० ते ८० उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी काँग्रेस पहिल्या बैठकीत सुमारे ११० उमेदवारांच्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी काँग्रेसने (congress) आपली ४३ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या उमेदवारांच्या यादीत पोरबंदरमधून अर्जुन मोधवाडिया आणि घाटलोडियामधून आणि याज्ञिक यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान, यावर्षी डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडं देशभराचं लक्ष लागलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. गुजरातमध्ये २७ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर या विधानसभा निवडणुकीत आपलं स्थान कायम राखण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसरीकडं विरोधी पक्ष काँग्रेसनेही पुन्हा सत्तेत येण्याचा दावा केला आहे. तर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानेही गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली आहे.

गुजरातमध्ये एकूण १८२ जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई पार पडणार आहे. बहुमतासाठी ९२ जागा जिंकायच्या आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग सहाव्यांदा ९९ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसनं ७७ जागा जिंकल्या होत्या. १८२ सदस्यीय गुजरात विधानसभेसाठी १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणुका होणार असून मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

गुजरातमधील सत्ताधारी भाजपने निवडणुकीबाबत अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची अद्याप घोषणा केली नाही. तर आम आदमी पक्षाने १०० उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराच्या नावाची घोषणाही केली आहे. इसुदान गढवी यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करण्यात आलं आहे.

हे ही वाचा :

Tripurari Poornima 2022 : त्रिपुरारी पौर्णिमा कथे बद्दल आणि पुजाविधी बदल जाणून घ्या…

उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यावर मोठी कारवाई; शरद कोळींच्या भाषणावर बंदी

कार शिकवणे जीवावर बेतले, ब्रेक देण्याऐवजी एक्सलेटरवर पाय ठेवला दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss