spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Red Chilli : लाल मिरची महागणार! मिरची राजधानी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या पाकिस्तानला मोठा फटका

प्रथम दुष्काळ, नंतर पूर आणि नंतर पाऊस यामुळे भारतातच पिकाचे नुकसान झाले नाही. त्याचबरोबर शेजारचे देश पाकिस्तानही या आपत्तीने हाहाकार माजवत आहे. पाकिस्तानातील प्रसिद्ध लाल मिरची पाऊस आणि पुरामुळे नष्ट झाली आहे. पाकिस्तानच्या लाल मिरचीचाही व्यापार भारतासोबत होतो. पाकिस्तान इतर देशांमध्येही लाल मिरची पाठवतो. त्यामुळे मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत खैरेच्या पक्ष फोडी वक्तव्यांवर नाना पाटोल्याचं प्रतिउत्तर

दक्षिण पाकिस्तानातील कुंरी शहर आशियातील मिरची राजधानी म्हणून ओळखले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक वर्षांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे पाकिस्तानमधील मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसत आहे. यंदा उष्णतेसह पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. पाकिस्तानच्या कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी आधीच पुरामुळे ४० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हेही वाचा : 

Virat kohli birthday : विराट कोहलीच्या वाढदिवसानिमित्त पत्नी अनुष्कानं मजेशीर पद्धतीने शुभेच्छा दिल्या

दरम्यान, पाकिस्तानातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात इतर देशांना लाल मिरची पाठवली जाते. मात्र, यावर्षी पुराचा मोठा तडाखा मिरचीला बसला आहे. दक्षिण पाकिस्तानातील कुनरी शहर आशिया खंडातील मिरचीची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, तिथेही मरची पिकाला मोठा फटका बसला आहे. तापमानात होत असलेली वाढ आणि पुराचा पाकिस्तानमधील मिरचीच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा उष्णतेसह पावसाचे प्रमाण अधिक झाल्यानं पुराची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मिरचीचे पीक उद्ध्वस्त झाले आहे.

पाकिस्तानच्या कृषी संशोधन परिषदेच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत उष्णतेमुळं मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. उष्णतेमुळं पिकांवर रोगांचे प्रमाण वाढत आहे. पिकांच्या उत्पन्नात झपाट्यानं घट झाली आहे. काही महिन्यांपूर्वी पुरामुळं शेतात पाणी शिरलं होतं. यामुळं मिरची पिकाचेही नुकसान झाले आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार मिरची पिकाला संजीवनी देण्यासाठी कापूस पिकाचा बळी देण्यात आला आहे. तिथे सध्या केवळ ३० टक्के मिरची टिकली आहे. गेल्या वर्षी मिरची बाजारात ८ ते १० हजार पोती आली होती. यंदा फक्त २००० पोती शिल्लक आहेत.

राशी भविष्य – ५ नोव्हेंबर २०२२ – आज कोणत्याही विषयावर बोलताना…

Latest Posts

Don't Miss