spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सत्तेचा गैरवापर सुरू असून माझ्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय – सुषमा अंधारे

काही दिवसांपूर्वी शिवसेनेत मोठा बंड झाला आणि त्यानंतर शिवसेनेत सुषमा अंधारे यांनी प्रवेश केला. सध्या सुषमा अंधारे यांच्याकडे प्रबोधनकार यात्रेची जबादारी सोपवण्यात आली आहे. सुषमा अंधारे यांना जळगावमधील त्यांच्या सभेला परवानगी नाकारतानाच त्यांना हॉटेलमध्येच नजरकैदेत ठेवल्याचा आरोप सध्या ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारसोबतच देवेंद्र फडणवीस, गुलाबराव पाटील यांच्यावरही टीकास्र सोडलं. सभेसाठी परवानगी नाकारणं हा केविलवाणा प्रकार होता, असंही त्या म्हणाल्या आहेत.

माझ्या सभेला परवानगी का नाकारण्यात आली? याचे काही कारण मला सांगण्यात आले नाही. तसेच माझ्या विरोधात कुठलाही तक्रार अर्ज जळगाव पोलीस स्टेशनमध्ये नाही. तसेच माझ्यावर कुठलीही FIR देखील दाखल नाही. त्यामुळे कुठलाही तक्रार अर्ज आलेला नसताना, तसेच कोणतेही अटक वॉरंट नसताना निव्वळ सत्तेचा गैरवापर करत गुलाबराव पाटील यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी मला ओलीस ठेवलं गेलं. मला कळत नाही नेमका आक्षेप कोणता आहे? असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांवर केला आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून अडथळे आणले गेले, तरी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करणारच, असा निर्धार सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे. “असं सगळं करून मी घाबरेन, असं काही पुढे करणार नाही असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. बाई समजून हलक्यात घेऊन नका. मी लढणार आहे. मी महिला म्हणून अजिबात व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. मी महाप्रबोधन यात्रा पूर्ण करून दाखवणार आहे”, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला आहे.

माध्यमांशी संवाद साधतांना सुषमा अंधारे यांनी म्हटलं की, सध्या सत्तेचा गैरवापर सुरू असून माझ्या विरोधात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मला ओलीस ठेवलं जातंय. आमचा घाव विरोधकांच्या वर्मी लागलाय. माझा आक्षेप देवेंद्र फडणवीसांवर आहे. सुषमा अंधारे म्हणाल्या. “गुलाबराव पाटील गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय हे सगळं करणार नाही. तसेच देवेंद्र फडणवीसांना या सगळ्या प्रकाराची कल्पना नसेल का? तुम्ही चिथावणीखोर भाषणं करता. प्रकाश सुर्वे हातपाय तोडायची भाषा करतात, संजय गायकवाड चुन चुन के मारेंगे म्हणतात, नारायण राणे एकेरीने भाष्य करतात, संतोष बांगरांचे पोलिसांबाबत केलेले वक्तव्य हे सगळं चिथावणीखोर नाही का? पण या सगळ्यापैकी एकावरही काहीच कारवाई केली जात नाही असं त्या म्हणाल्या.

हे ही वाचा :

Coronavirus in India : चीनमध्ये पुन्हा कोरोनाचे थैमान, तर मुंबईत XBB व्हेरियंटचा शिरकाव

Red Chilli : लाल मिरची महागणार! मिरची राजधानी म्हणून ओळ्खल्या जाणाऱ्या पाकिस्तानला मोठा फटका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss