शनिवारी दुपारी मुंबई फॅशन स्ट्रीटमधील रस्त्याच्या कडेला असलेली किमान १० दुकाने आगीत भस्मसात झाली, एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. चर्चगेटजवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या कपड्यांचे मार्केट मध्ये म्हणजेच फॅशन स्ट्रीटवरील एका दुकानात दुपारी १ च्या सुमारास आग लागली आणि काही वेळातच ती त्याच्या लगतच्या काही दुकानांमध्ये पसरली, असे त्यांनी सांगितले. “अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिल्यानंतर, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या,” असे अधिकारी म्हणाले, सुमारे १५ मिनिटांत आग विझवण्यात आली.
Mumbai मुंबईत प्रसिद्ध शॉपिंग सेंटर फेशन स्ट्रीट परिसरात आग लागली, व्यावसायिकांचे मोठे नुकसान #MumbaiCity #shopping #Mumbaifashionstreet #FireLecce @mybmc pic.twitter.com/HvRwIsv9Jn
— Time Maharashtra (@TimeMaharashtra) November 5, 2022
मुंबईतील फॅशन स्ट्रीट येथील दुकानांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. आगीचे कारण आणि त्यामुळे किती नुकसान झाले हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणी अजून माहितीची प्रतीक्षा आहे.
या घटनेत काही दुकानामधील साहित्य जळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थली दाखल झाल्यानंतर काही कालावधीतच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले. आग कोणत्या कारणाने लागली, याचा शोध सुरू आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली. तर घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर नागरिकांची गर्दी दिसून येत आहे.
हे ही वाचा :
Ajit Pawar : शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबीराला गैरहजर; पुन्हा एकदा नाराज?
आम्ही पुढे होऊन सत्तास्थापन केली नसती तर… – गुलाबराव पाटील