spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकर आज संपूर्ण आठवड्यातील स्पर्धकांची अक्कड उतरवणार

‘बिग बॉस मराठी ४’चा गाजावाजा सर्वत्र पहायला मिळत आहे. दिवसेंदिवस रंजक होत चाललेल्या शोमध्ये वादही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. त्यामुळे घरातील वातावरण सतत बदलत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसच्या घरात कधी काय घडेल आणि कोणाचा कधी कोणावर पारा चढेल याचा काही नेमच नाही. वेगवेगळे टास्क घरात होत असून स्पर्धकांचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येत आहेत. मात्र सर्वांना उत्सुकता असते ती आठवडा अखेरची घोस्ट महेश मांजरेकर यांच्या शाळेची तर आज शनिवारी मांजरेकर स्पर्धकांची अक्कड उतरवणार आहेत.

टाईम महाराष्ट्र आयोजित ‘सुंदर माझा बाप्पा’ स्पर्धा २०२२ पारितोषिक वितरण समारंभ

या आठवड्यात स्पर्धकांनी अक्षरशः राडा घातला. मग ते ‘खुल्ला कर राडा’ या टास्कमध्ये स्पर्धकांनी धुमाकूळ घातला. ही कार्य बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठे कार्य होते. शिवाय कॅप्टनसी टास्कही विशेष रंगला. यामध्ये त्रिशूल आणि प्रसादच्या धक्काबुक्कीत घराची काच फुटली. त्यामुळे या सगळ्या राड्यांचा आज हिशोब होणार आहे. त्याचा एक प्रोमो नुकताच समोर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

हेही वाचा : 

‘आम्ही इंटरटेनर नाही आम्ही पॉलिसीमेकर आहोत…’ ; खासदार सुप्रिया सुळे

‘या आठवड्यात सगळे बालपणाच्या खेळात रमले. काहींनी सी-सॉ वरची पकड सोडली नाही, तर काहींनी स्वभावातली अक्कड.. त्यामुळे आज यांची अक्कड मोडूया.. चावडीवर भेटूया..’ असे मांजरेकर या प्रोमोत म्हणतात. हा प्रोमो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, आज मांजरेकर कुणाची तासणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बिग बॉसच्या सदस्यांमध्ये दोन ग्रुप पडल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतत कोणाची ना कोणाची तरी भांडण सुरुच असतात. टास्कदरम्यान तर स्पर्धक एकमेकांवर चढतात. त्यांचं वेगळंच रुप टास्कमध्ये पहायला मिळतं. या वर्षीच्या स्पर्धकांमुळे सीझनची रंगत आणखीनच वाढलीये. बिग बॉस सुरु झाल्यापासून घरामध्ये अनेक टास्क पार पडले. सोबत अनेक वाद-विवाद, राडे, मस्ती धम्मालदेखील पहायला मिळाली. नेहमीप्रमाणे यंदाही सोशल मीडियावर बिग बॉसची मोठी क्रेझ पहायला मिळत आहे. घरातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होत असलेले पहायला मिळतात.

Janhvi Kapoor : ब्लू आऊटफिट मध्ये ‘जान्हवी कपूरचे’ बोल्ड फोटोशूट

Latest Posts

Don't Miss