spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात ड्रेनेज साफसफाई करताना दोन कामगारांचा मृत्यू

काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये ड्रेनेज साफ करतांना लोकांच्या मृत्यू होण्याची संख्या वाढत चाली आहे. तर आज पुण्यात धक्कादायक बातमी समोर आली आहे. ड्रेनेज साफ करताना दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे (pune) जिल्ह्यातील रांजणगाव परिसरातील एमआयडीसीमधील (Ranjangaon MIDC) फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करताना ही घटना घडली आहे. मच्छिंद्र काळे आणि सुभाष उघडे असं मृत्यू झालेल्या कामगारांची नावं आहेत. दोन्ही कामगार बीव्हीजी कंपनीसाठी मागील १८ वर्षांपासून काम करत होते.

एमआयडीसीमधील फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करण्याचं काम सुरु होतं. दोघेही कामासाठी रावाना झाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे सुपरवायझरदेखील होते. काम करत असताना एका कामगाराचा पाय चुकून घसरला आणि कामगार ड्रेनेजच्या डक्टमध्ये पडला. या सगळा प्रकार पाहून सोबत असलेला दुसऱ्या कामगाराने साथीदाराला वाचवण्यासाठी डक्टमध्ये उडी मारली. यात दोघेही बुडल्याचं कळताच सुपरवायझर यांनी मदतीसाठी हाक मारली. ते कंपनीत देखील मदत मागण्यासाठी गेले. मात्र डक्ट प्रचंड प्रमाणात खोल असल्याने दोघेही लगेच बुडाले. या दोघांना बाहेर काढण्याचं काम कठीण होतं. शेवटी जेसीबीच्या साहाय्याने हा डक्ट फोडण्यात आला. डक्टमध्ये प्रचंड प्रमाणात घाण पाणी असल्याने दोघेही सापडत नव्हते. त्यांनी घाण पाणी काही प्रमाणात बाहेर काढल्यानंतर दोघांचे मृतदेह सापडले.

पीएमआरडीए अग्निशमन जवानांनी दोघांना गंभीर अवस्थेत बाहेर काढले होते. ही घटना कळताच पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान घटनास्थळी पोहचले होते आणि त्यांनी दोरीचा आधार घेत दोघांना बाहेर काढलं होतं. सुदैवाने तिसरा कर्मचारी बचावला होता. साफसफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच समोर येत असतो. या सगळ्या घटनांमुळे कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे कामगारांचा जीव जाऊ नये यासाठी संबंधित संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

हे ही वाचा :

जो आज साहिबे मसनत है, कल नहीं होंगे, किरायेदार है, जाती मकान थोडी है? ; धनंजय मुंडेंचा हटके अंदाजात सरकारला इशारा

अरविंद केगरीवाल यांचा खळबळजनक दावा;भाजपने मला गुजरात निवडणूक न लढवण्याची ऑफर दिली

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss