spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अजित पवार मुख्यमंत्री होणे हे कधीही शक्य नाही ; विजय शिवतारेंचा पवारांवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी वक्तव्य केला होता की अजित पवार यांच्यासारखा व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असल्यास राज्याचा नक्कीच फायदा होईल,अजितदादांकडे असलेल्या अनुभवामुळं राज्यातील नागरीकांना योग्य वेळी निर्णय घेतल्याचा फायदा होईल त्यावर माजी मंत्री विजय शिवतारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे हे पुणे जिल्ह्यातीलदापूरमध्ये संघटनात्मक बैठक घेण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे , ते म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे हे कधीही शक्य नाही आहे. मुख्यमंत्री व्हायची त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. ते मुख्यमंत्री होणार नाहीत, तसेच ते म्हणाले कि १९७८ पासून आजपर्यंत पवार साहेबांना जनतेने कधीही पूर्ण बहुमत दिले नाही. दोन ते तीन जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. त्याचं कारण सहकार आहे. त्यामुळे लोक त्यांच्या सोबत असतात. ते सत्तेचा गैरवापर करतात, असा हल्लाबोल माजी मंत्री विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर केला आहे

यावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील भाष्य केलं होतं. लोकशाहीत मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, अशी इच्छा व्यक्त करायला हरकत नाही. अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं असेल तर पुन्हा एकदा बहुमत सिद्ध करावं लागेल. त्यासाठी शिवसेना आणि कॉंग्रेसला सोबत घ्यावे लागणार आहे. मात्र २०२४ पर्यंत तीन पक्ष सोबत राहतील का?, असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील त्यांनी उपस्थित केला होता. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अडीच वर्ष मविआ सरकार असताना ओला दुष्काळ जाहीर केला नाही, याची आठवण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना असायला हवी, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुढे सांगितले कि “महात्मा गांधी देश फिरले, सर्वसामान्यांमध्ये वावरले त्यामुळे त्यांच्यासारखे नेते भारताला मिळाले, हे उद्धव ठाकरे आणि माजी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फार उशिरा कळलं. मातोश्रीवर राहून राज्यातील लोकांचे दुख: कळतात, असं त्यांना वाटत होतं. मात्र आता प्रत्यक्ष दौरे करत असताना त्यांना अनेक गोष्टींचा सक्षात्कार झाला. ही चांगलीच बाब आहे .

हे ही वाचा :

Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकर आज संपूर्ण आठवड्यातील स्पर्धकांची अक्कड उतरवणार

‘आम्ही इंटरटेनर नाही आम्ही पॉलिसीमेकर आहोत…’ ; खासदार सुप्रिया सुळे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss