spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर… ; देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन पाळलं गेलं नाही, म्हणून आम्ही भाजपसोबतची युती तोडली असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून कायम करण्यात येतो. पण नक्की काय घडलं होतं? भाजपनं खरंच शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती का? याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

फडणवीस म्हणाले, “आमच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंसमोर दहा वेळा ही घोषणा केली होती की, २०१९ ची निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येईल. पंतप्रधानांसह अमित शहा आणि आमच्या सर्व मोठ्या नेत्यांनी ही घोषणा केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील टाळ्या वाजवत होते. इतकचं नव्हे तर उद्धव ठाकरेंनी स्वतःही घोषणा केली होती. त्यामुळं सर्वांनी मिळून केवळ पंतप्रधानाच नव्हे शिवसेना आणि भाजपनं मिळून मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषीत केलं होतं. पण युती होऊन निकाल समोर आल्यानंतर अचानक त्यांच्या असं लक्षात येतं की, शिवसेनेला मतंच अशी पडलीत की, तीन पक्ष एकत्र आले तर आपला मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळं अचानक उद्धव ठाकरेंनी आपला पवित्रा बदलला”

“आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर गेल्या अडीच वर्षात राज्यात ज्या प्रकारे घटना घडल्या होत्या. त्यामुळे आम्ही सत्तापरिवर्तन केले. मात्र, जेव्हा तुम्ही मुख्यमंत्रीपदी राहता आणि त्यानंतर दुसऱ्या सरकारमध्ये सहभागी होता, तेव्हा तुम्ही सत्तेसाठी हपापलेले आहात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे मी सरकारमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, असा निर्णय घेतल्यानंतर मला वरिष्ठांनी सांगितले की, तुम्ही राज्यातील महत्त्वाचे नेते आहात. तसेच तुम्ही यापूर्ण मुख्यमंत्रीही राहिले आहात. त्यामुळे आम्हाला सरकार चालवण्यासाठी तुमच्या अनुभवाची आवश्यकता आहे. म्हणून मी सरकारमध्ये सहभागी होणाचा निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच आज जेव्हा मी मागे वळून बघतो, तेव्हा मला हा निर्णय योग्य वाटतो”, असेही ते म्हणाले.

हे ही वाचा :

चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या पक्षाततरी कोण विचारते का? ; नाना पटोले

IND vs ZIM : झिम्बाब्वे विरुद्ध सामना भारतासाठी सुवर्ण संधी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss