spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

निलेश राणे यांना मोठा दिलासा; जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली

नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे कुठल्याना कुठल्या कारणाने नेहेमी चर्चेत असतात. पण आज निलेश राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा न्यायालयाच्या बाहेर पोलिसांशी हुज्जत घातल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणी पोरस येथील न्यायालयात याबाबत दावा सुरू होता.

संतोष परब हल्ला प्रकरणात जिल्हा न्यायालयात आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असताना याच दरम्यान हायकोर्टाकडून आमदार नितेश राणे यांना अटकेपासून दहा दिवसांसाठी दिलासा देण्यात आला होता. यावेळी आमदार नितेश राणे कोर्टातून बाहेर पडत असताना पोलिसांकडून आमदार नितेश राणे यांना अटकेचा प्रयत्न केला जात असताना त्यांना अटकाव करताना पोलिसांशी हुज्जत घातल्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांच्याविरुद्ध ओरोस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाची सुनावणी आज ओरोस जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए. एम. फडतरे यांच्या कोर्टात सुरू होती. या सुनावणीदरम्यान न्यायाधीश फडतरे यांनी माजी खासदार नीलेश राणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप युवा नेते आनंद शिरवलकर, युवा मोर्चा अध्यक्ष श्रीपाद तवटे, कणकवली भाजप अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष तुकाराम साईल, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रुपेश बिडये यांना सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या दरम्यान बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवली येथे १८ डिसेंबर २०२१ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संतोष परब हे करंजे गावचे माजी सरपंच आहेत. तसेच ते जिल्हा बँकेचे देखील मतदार आहेत. परब हे सतीश सावंत यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्यावर कणकवलीत झालेल्या हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांच्यासह मुख्य संशयीत आरोपी नितेश राणेंच्या स्वाभिमान संघटनेचा पुण्यातील कार्यकर्ता सचिन सातपुते, नितेश राणे यांचे खाजगी सचिव राकेश परब यांना अटक करण्यात आली होती.

हे ही वाचा :

आम्हाला सत्ता हवी म्हणून आम्ही सत्तापरिवर्तन केले नाही, तर… ; देवेंद्र फडणवीस

चंद्रशेखर बावनकुळेंना त्यांच्या पक्षाततरी कोण विचारते का? ; नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss