spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात वळवणार, उपमुख्यमंत्र्यांचा दावा

ठाकरे सरकारच्या कार्यकाळात न झालेल्या प्रकल्पांना आता शिंदे आणि फडणवीस सरकार गती देणार आहे. आज दुपारी सह्याद्री अतिथिगृहावर याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली.

मुंबई : ठाकरे सरकारच्या कार्यकाळात न झालेल्या प्रकल्पांना आता शिंदे आणि फडणवीस सरकार गती देणार आहे. आज दुपारी सह्याद्री अतिथिगृहावर याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची दोन तास बैठक झाली. या बैठकीमध्ये वर्ल्ड बँक चे अधिकारी देखील सहभागी होते. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, सांगली कोल्हापूरमधील पुराचे पाणी मराठवाडा मध्ये वळवण्याचा प्रकल्प, समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत नेण्याची योजना अशा काही योजनांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यात ते म्हणाले की, जुन्या सरकारच्या कार्यपद्धतीबाबत दोष देण्याऐवजी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही मिळून या प्रोजेक्टला फास्टट्रॅक वर आणण्याचे ठरवले आहे. असा दावा उपमुख्यमंत्र्यांनी केला.

हेही वाचा :

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ सर्वसामान्य महिला उतरल्या रस्त्यावर

पश्चिम महाराष्ट्रातील पाणी मराठवाड्यात येणार

2019 ला सांगली कोल्हापूरला पूर आला होता. दरवर्षी अशा प्रकारचा पूर आला तर काय करायचे याबाबत वर्ल्ड बँकेसोबत अभ्यास केला. वळण बंधारे, टनेलच्या माध्यमातून पाणी हे मराठवाड्यात वळवता येईल का याचा अभ्यास केला त्यानंतर हे पाणी पुराचे पाणी आहे हे दुसऱ्या खोऱ्यात नेता येते. एकूणच या मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आणि या योजनेस संदर्भात मुख्यमंत्र्यांनी डीपीआर काढण्याचे आदेश दिले आहेत. व या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने मान्यता दिली आहे.

समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरीत पळवण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. तत्काळ हे सगळे टारगेट स्टेजवर नावे असा आदेश मुख्यमंत्री यांनी दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

‘धर्मवीर’साठी प्रसाद ओक ला शाहीर दादा कोंडके स्मृती गौरव सन्मान पुरस्कार जाहीर

Latest Posts

Don't Miss