spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘महाराष्ट्रतील सरकार हे शेतकरी विरोधी आहे’; नाना पाटोलेंचा सरकारवर हल्लाबोल

काही महिन्यांपूर्वी शिवसेनेमध्ये फूट पडली त्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार होऊन महाराष्ट्रातील माविआ सरकार कोसळून शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल. त्यामुळे आधीच सरकार आणि आत्ताच सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच आहे . त्यात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकरा आहे. त्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही’, असे म्हणत भाजप सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे.

वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर आधीच माविआ सरकार आणि आताचा शिंदे फडणवीस सरकार एकमेकांवर त्याच खापर फोडत आहेत. दोन्ही सरकार पत्रकार परिषदा घेऊन प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी काय काय त्यांनी प्रयत्न केले हे सांगत आहेत. तर आता वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पही गुजरातला गेल्यानंतर राजकीय वातावरण अजून तापले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेनी औरंगाबादमधील सभेत केलेल्या वक्तव्याचा आधार घेत सरकारवर हल्लाबोल केला आहे . नाना पाटोले यांनी सांगितले कि, भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी सरकरा आहे. त्याला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. ते बोलतील काय, त्यांचा अजेंडा काय हे सर्वांना माहित आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमध्ये स्पष्ट केलं आहे की, ते (मुख्यमंत्री शिंदे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे हस्तक आहेत . त्यामुळं ते राज्याचे मुख्यमंत्री नसून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, असे म्हणत नाना पटोले यांनी सरकारला टोला लगावला आहे.

नाना पाटोले यांनी पुढे सांगितले कि विदर्भात होणारे प्रकल्प गुजरातला जात आहेत . हे सरकार म्हणजे सर्वांवरच संकट आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन नाना पटोलेंनी केलं. तुम्ही आत्महत्येचा मार्ग स्वीकारु नका, तुम्हाला न्याय देण्याची व्यवस्था निश्चित होईल. शेतकऱ्यांनी काँग्रेसच्या पाठिशी उभं राहावं असं आवाहन पटोले यांनी केलं.

हे ही वाचा :

CM Eknath Shinde: शिंदे गट पुन्हा गुवाहटीला जाणार? नेमकं शिजतंय काय?

गुवाहटीच्या वाटेवर लक्ष ठेवा, कुछ तो गडबड है…अजित पवार नाराज? काळेंच्या ट्विटमुळे चर्चा

कामगार नोंदणी केवळ १ रुपयात; शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss